Kalyan News
Kalyan NewsSaam tv

Kalyan News : पोलिसांविरोधात भाषण देणे पडले महागात; ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाविरोधात गुन्हा

पोलिसांविरोधात भाषण देणे पडले महागात; ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाविरोधात गुन्हा
Published on

अभिजीत देशमुख

कल्याण : अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या घटनेनंतर २० तारखेला कोळशेवाडी पोलीस ठाण्यावर काढण्यात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुखाने (Police) पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांविरोधात भाषण करत पोलिसांवर टीका केली होती. पोलिसांविरोधात भाषण (Kalyan) करणाऱ्या ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख नीरज कुमार यांच्या विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Breaking Marathi News)

Kalyan News
Parbhani News: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रास्ता रोको; गंगाखेड रोडवर वाहतूक खोळंबली

कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गट शिवसेनेच्यावतीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर २० ऑगस्टला मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात पोहचला असता त्याठिकाणी कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यानी ठिय्या मांडला. यावेळी ठाकरे गटाचे युवा सेना शहर प्रमुख नीरज कुमार यांनी भाषण केले. हे भाषण पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारे होते. क्राईम वाढले आहे. आम्ही करदाते नागरीक आहोत. आमची सुरक्षा करणे पोलीसांचे कर्तव्य आहे. त्या बदल्यात पोलिसांना पगार मिळतो. पोलिसांना किती हप्ता पाहिजे. पगार पुरत नसेल तर आम्ही लोकवर्गणी काढून पैसे देऊ; असे भाषण नीरज कुमार यांनी केले हाेते. 

Kalyan News
Anil Bonde Statement: कांद्याबाबत आंदोलन करून गळे काढण्याचं काम; खासदार अनिल बोंडेचा शरद पवारांवर निशाणा

भाषणाची व्हीडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्याची दखल घेत पोलिसांच्या विरोधात भाषण केल्याप्रकरणी नीरज कुमारसह पाच जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरज कुमार हे व्यवसायाने वकील आहेत. यासंदर्भात नीरज कुमार यांनी पोलिसांना जाब विचारण्याकरीता मोर्चा काढला होता. पोलिसाना मोर्चा झाेंबला आहे. पोलिसांनी आमच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीच्या मार्गाने पोलिसांना हार घालून त्यांची आरती ओवाळू. सत्य मांडण्याचे काम करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि गृह मंत्रालयाचा निषेध करतो. पोलिसांकडून यासंदर्भात अद्याप बोलावणे आलेले नाही. बोलविणे आल्यास आम्ही नक्कीच जाऊ अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com