Anil Bonde Statement: कांद्याबाबत आंदोलन करून गळे काढण्याचं काम; खासदार अनिल बोंडेचा शरद पवारांवर निशाणा

Amravati News कांद्याबाबत आंदोलन करून गळे काढण्याचं काम; खासदार अनिल बोंडेचा शरद पवारांवर निशाणा
Anil Bonde Sharad Pawar
Anil Bonde Sharad Pawar Saam tv
Published On

अमर घटारे  

अमरावती : शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी अनियंत्रित काळाकरीता निर्यात बंदी केली होती. सरकारने आता निर्यात बंदी केली नाही. केवळ कर लावला. हा कर केवळ साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर (Sharad Pawar) अंकुश ठेवण्यासाठी लावलाय. शरद पवारांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम केले नाही. आता केवळ व्यापाऱ्याकरिता गळे काढण्याचं काम करत असल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केला आहे. (Maharashtra News)

Anil Bonde Sharad Pawar
Kinwat Railway Station: धावत्या रेल्वेत चढताना पाय घसरला; रेल्वे खाली आल्याने तरुण गंभीर जखमी

कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के कर सरकारने लावला. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. निषेध देखील केला जातोय. यावर मात्र खासदार अनिल बोंडे यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली. 

Anil Bonde Sharad Pawar
Parbhani News: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रास्ता रोको; गंगाखेड रोडवर वाहतूक खोळंबली

विरोधकांना नाक नाही 

कराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सरकारने नाफेडकडून २ लाख टन कांदा शेतकऱ्यांकडून (Farmer) खरेदी करण्याचा संकल्प केलाय. या (Onion) कांद्याला २४१० रुपयांचा भाव जाहीर केला. शेतकऱ्यांचं कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. व्यापाऱ्यांकडून साठेबाजार होणार नाही याची काळजी घेण्यात आलीय. विरोधकांना बोलण्याच नाक राहील नाही; त्यामुळे ते आंदोलन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com