kalyan Crime News
kalyan Crime NewsSaam Tv

kalyan Crime News: कल्याणमध्ये भररस्त्यात अल्पवयीन मुलाला मारहाण; पोलिसांनी ३ महिलांसह ८ जणांना अटक, काय आहे प्रकरण?

देवस्थानाबद्दल इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवर कमेंट्स करणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या ८ जणांना अटक करण्यात आली आहे.

अभिजीत देशमुख

kalyan Crime News: देवस्थानाबद्दल इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवर कमेंट्स करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी ५ आरोपींना यापूर्वी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणातील तीन महिलांना अटक केली आहे.

या तिन्ही महिलांना कल्याण न्यायालयाने २५ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे. या प्रकरणात अजून दहा ते बारा आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. मोठ्या पोलिस बंदोबस्तात तिन्ही महिलांना आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Latest Marathi News)

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आठ आरोपी अटक केली आहे. तसेच चार अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेऊन पुढची प्रक्रिया केली आहे.आरोपीमध्ये तीन महिलांच्या समावेश आहे चार तरुण हे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधागृहात करण्यात आली आहे.

kalyan Crime News
Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये युवकाची गोळ्या झाडून हत्या, परिसरात तणावाचं वातावरण

काय आहे प्रकरण?

काही दिवसापासून कल्याणमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात इन्स्टाग्रामवर जोरदार वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलगा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. त्याने एका समाजाच्या देवस्थानाविषयी आक्षेपार्ह विधानावर कमेंट केली होती.

दुसऱ्या गटाने या तरुणाचा शेाध घेतला. त्याला शोधून काढले. त्याला शुक्रवारी मारहाण केली. त्याला जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

kalyan Crime News
Jalgaon Crime News: भयंकर! मुलांना मारुन टाकण्याची धमकी देत विवाहितेचा घरात घुसून विनयभंग

खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनुसार त्याला मारहाण करणारे आणि जमीनीवर नाक घासण्यास भाग पाडणाऱ्यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नव्हे तर आक्षेपार्ह विधान करत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दुसऱ्या गटाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com