Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये युवकाची गोळ्या झाडून हत्या, परिसरात तणावाचं वातावरण

Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये युवकाची गोळ्या झाडून हत्या, परिसरात तणावाचं वातावरण

Pimpri Chinchwad Crime News: पिंपरीच्या चिखली पोलीस स्टेशन हद्दीत ही गोळीबार आणि हत्येची घटना घडली आहे.

Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवड शहरातील चिखली गावठाण परिसरात सोन्या तापकीर या युवकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात आरोपींनी आज दुपारी सोन्या तापकीरवर अंदाधुंद गोळीबार करुन त्याचा खून केला आहे.

गोळीबारात सोन्या तापकीर गंभीर जखमी झाला होता. पुढे उपचारादरम्यान त्याचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ह्या गोळीबारात आणि खुनाच्या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Crime News)

Pimpri Chinchwad Crime News: पिंपरी चिंचवडमध्ये युवकाची गोळ्या झाडून हत्या, परिसरात तणावाचं वातावरण
Mumbra Fire News : मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात आग; झगडे चाळीतील दाेन मुलांसह चाैघे जखमी

काही दिवसापूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीत शिरगाव येथील सरपंच प्रवीण गोपाळे याची गोळीबार करून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांची गोळीबार करून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. (Latest News Update)

त्यानंतर आज पुन्हा एकदा चिखली परिसरात सोन्या तापकीर या तरुणावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याने पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सतत होणाऱ्या गोळीबार आणि खुनाचा घटनेमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरिक मोठ्या दहशतीखाली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com