Kalyan News
Kalyan NewsSaam tv

Kalyan News : नशेखोर टोळक्याची दहशत; भररस्त्यात शिव्या, मारहाण करत घातला धिंगाणा

Kalyan News : जोर जोरात ओरडणे, चित्रविचित्र आवाज काढणे , शिव्या देणे, दारुच्या बाटल्या कुठेही फेकणे, मारहाण करणे, राडा करणे असे प्रकार सुरु असतात
Published on

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण पूर्वेत असलेल्या ओपन जीम, उद्यानात नशेखोर तरुणांचा धिंगाणा सुरु आहे. काही तरुण येथे नशा (Kalyan) करून धिंगाणा घालत असून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचा (Crime News) प्रकार समोर आला आहे. यामुळे कल्याण पूर्वेत गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. (Breaking Marathi News)

Kalyan News
Bribe Trap : फाईलवर सहीसाठी महिला सरपंचाच्या पतीने स्वीकारली लाच; लाच लुचपत विभागाने घेतले ताब्यात

कल्याण पूर्वेतील अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस दारुड्यांच्या पार्ट्या, गांजा पिणारे काही ठिकाणी जमतात. कल्याणच्या खडेगोळवली परिसर, १०० फूटी रोड,विजयनगर ड प्रभाग कार्यालयाच्या मागे अशा ठिकाणी ही टोळके ठाण मांडून बसतात. धक्कादायक म्हणजे विजयनगर परिसरात नागरिकांसाठी असलेल्या गार्डन, ओपन जिम येथे अंधार होताच नशेखोर उनाड तरुणांच्या टोळक्याने व्यापून जातो. जोर जोरात ओरडणे, चित्रविचित्र आवाज काढणे , शिव्या देणे, दारुच्या बाटल्या कुठेही फेकणे, मारहाण करणे, राडा करणे असे प्रकार सुरु असतात. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan News
Sharad Pawar News: शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक करणाऱ्यांचा लवकरच बंदोबस्त; आमदार शिंदेंवर शरद पवारांचा निशाणा

कारवाईची मागणी 

दोन दिवसांपूर्वी तरुणांचे दोन गट  भिडल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महिला लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या ठिकाणी पोलिसांची ग्रस्त असतात. दोन पोलीस बाईकवर येतात परिस्थिती पाहतात आणी निघून जातात असा आरोप देखील नागरिकांनी केलाय. अशा राडेबाज नशाखोर तरुणांवर कठोर कारवाई करावी; अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com