मनोज जयस्वाल
वाशिम : महिला सरपंच असल्यास त्यांचे पती कारभार सांभाळत असतात. हा कारभार सांभाळताना (Bribe) फाईलवर सहीसाठी सरपंच पतीने लाभार्थीकडून १३ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना सरपंच पती लाचलुचपत विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकला. (Live Marathi News)
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गहुली येथे ही कारवाई झाली आहे. गहुली येथील सरपंच गौकर्नाबाई विष्णू राठोड व त्यांचे पती विष्णू मंगु राठोड अशी लाच स्वीकारणाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचे एक घरकूल तसेच त्यांचे नातेवाईक यांचे एक घरकुल असे दोन घरकुल मंजूर होते. या घरकुलाच्या फाईलवर सही करण्याकरिता ४ हजार रुपये तसेच तक्रारदार यांचे नातेवाईक यांचे दोन विहिरीच्या फाईलवर सही करण्याकरिता १० हजार रुपये असे एकूण १४ हजार रुपयांची मागणी गहूलीच्या सरपंच गोकर्ण विष्णू राठोड व त्यांचे पती विष्णू राठोड यांनी केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान तडजोडीअंती १३ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ठरल्याप्रमाणे सरपंच पटीने तक्रारदाराकडून १३ हजार रुपये स्वीकारले. याचवेळी वाशिमच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने विष्णू राठोड यांना रंगेहाथ पकडत कारवाई केली. आरोपी यांचे विरुद्ध पोस्टे मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.