Aurangabad Crime: लग्नाचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार, २ कोटीही उकळले; शिंदे गटाच्या समर्थकावर गुन्हा दाखल

Jyotiram patil Aurangabad News | पीडिता गर्भवती राहताच तिचा गर्भपात करुन नंतर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजळनक प्रकार समोर आला आहे.
JYOTIRAM PATIL Aurangabad Crime
JYOTIRAM PATIL Aurangabad Crime Saam TV
Published On

औरंगाबाद: औरंगाबादमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका विवाहीत महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल २ कोटी रुपये उकळण्यात आले आहेत. संतापजनक बाब म्हणजे हे सगळं करणारा आरोपी राजकाणातील शिंदे गटाचा समर्थक आहे. त्याने महिलेला ब्लॅकमेलही केले, तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला आणि नंतर जीवे मारण्याची धमकी दिली. (Aurangabad Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, युवासेनेचा पदाधिकारी राहिलेला आणि आता शिंदे गटामध्ये सामील झालेला कट्टर शिंदे गट समर्थक ज्योतीराम विठ्ठल धोंगडे-पाटील (Jyotiram patil) याने एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आरोपावरून औरंगाबाद (Aurangabad) शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पीडितेकडून जवळपास दोन कोटी रुपये उकळले आहेत. त्यासोबतच पीडिता गर्भवती राहताच तिचा गर्भपात करुन नंतर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजळनक प्रकार समोर आला आहे.

JYOTIRAM PATIL Aurangabad Crime
Sidhu Musevela murder case |सिद्धू मुसेवाला खून प्रकरणी NIA चे ४ राज्यांमध्ये छापे; आतापर्यंत 23 आरोपींना अटक

अश्लील व्हिडिओ शूट करत ब्लॅकमेल

पीडितेच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा अधिक तपास करतायत. ज्योतीराम धोंडगे-पाटील हा महापालिकेच्या टँकरने जयभवानीनगर भागात पाणी पुरवठा करत होता. पाणी पुरवठा करताना त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. पाणी पुरवठ्याच्या निमित्ताने दोघांचे एकमेकांना फोन आणि मॅसेजेस सुरू झाले, दोघांची ओळख अधिक वाढत गेली. ज्योतीराम याने त्या महिलेच्या पतीसोबतही मैत्रीचे संबंध निर्माण केले. यानंतर त्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एप्रिल २०१९ मध्ये दौलताबाद परिसरातील हिरण्य रिसॉर्ट येथे त्या महिलेला फिरायला नेले, तिथे दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. यावेळी आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओही (Video) शूट केला.

ब्लॅकमेल करत पीडितेकडून तब्बल २ कोटी रुपये उकळले

त्या दिवसापासून ज्योतिराम याने महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने वारंवार वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागितले, तसे न केल्यास त्या रिसॉर्टमध्ये शूट केलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो महिलेला ब्लॅकमेल (Blackmail) करु लागला. तेव्हापासून ज्योतिराम याने महिलेकडून रोख रक्कम, एक मोबाइल, यांसह ३५ लाख रुपयांचे दागिने घेतसे. त्यानंतर त्याने राहत्या घरासह शहरातील नामांकित हॉटेलमध्ये नेऊन महिलेवर अत्याचार केले आणि पैशांची मागणी केली.

ज्योतिराम याने ब्रेझा गाडी, घराचे बांधकाम, पर्सनल लोन, क्रेडिट कार्डचे या सगळ्यांचे हफ्ते भरण्यासाठीही पीडित महिलेकडूनच रोख आणि ऑनलाइन स्वरुपात पैसे वसूल केले असे पीडितेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात पिडितेने तक्रार दिल्यानंतर बलात्कार, खुनाचा प्रयत्न, गर्भपात करण्यासह सात कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

JYOTIRAM PATIL Aurangabad Crime
Bindass kavya : बिनधास्त काव्याचे Youtube मेंबरशीप दर NetFlixपेक्षाही महाग; 799 रुपये महिन्याचं सबस्क्रीप्शन

कोण आहे ज्योतीराम धोंगडे?

ज्योतीराम यापूर्वी युवासेनेचा शहरप्रमुख होता. नुकत्याच झालेल्या गणपती महोत्सवात अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्याचा वावर पहायला मिळाला. शिवसेनेत फुट पडल्यानंतर मोठ्या नेत्यांसह त्याने शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे क्रांतीचौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारात तो अग्रगणी होता. त्याचा स्वत:चा युवा मंच असल्याने ज्योतीराम सोशल मीडियावरही प्रसिध्द होता, मात्र आता वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झाला असून औरंगाबादमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com