Sidhu Musevela murder case |सिद्धू मुसेवाला खून प्रकरणी NIA चे ४ राज्यांमध्ये छापे; आतापर्यंत 23 आरोपींना अटक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येशी संबंधित संशयित दहशतवादी टोळ्यांसंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा दिल्ली, एनसीआर, हरियाणा आणि पंजाबमध्ये विविध ठिकाणी छापा टाकला आहे.
Sidhu Musevela murder case
Sidhu Musevela murder caseSaam Tv
Published On

नवी दिल्ली: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येशी संबंधित संशयित दहशतवादी टोळ्यांसंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) दिल्ली, एनसीआर, हरियाणा आणि पंजाबमध्ये विविध ठिकाणी छापा टाकला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या 160 अधिकाऱ्यांनी हे छापे टाकले आहेत. दिल्ली, एनसीआर, हरियाणा आणि पंजाबमध्ये 60 हून अधिक ठिकाणांचा तपास सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येतील सहावा शूटर दीपक मुंडी याला त्याच्या दोन साथीदारांसह नेपाळमधून पकडले. पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव यांनी काल पत्रकार परिषदेत या अटकेबाबत आणि मूसवालाच्या हत्येबाबत माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एनआयएने (NIA) ही कारवाई केली.

Sidhu Musevela murder case
Petrol Diesel: पेट्रोल डिझेल होणार स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

दीपक मुंडी, राजिंदर जोकर आणि कपिल पंडित या दोघांना नेपाळमधून पकडण्यात आले आहे. सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणाऱ्या सहा शुटरपैकी दीपक मुंडी हा एक आहे. तो बनावट पासपोर्टवर नेपाळमधून दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत 23 आरोपींना अटक करण्यात आली आहे, यात 35 जणांची नावे आहेत. 29 मे 2022 रोजी सिद्धू मुसेवाला यांची पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

Sidhu Musevela murder case
Swami Swaroopanand Passed Away : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं निधन, ९९ व्या घेतला अखेरचा श्वास

पंजाब सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी (Police) इतर ४२४ जणांची सुरक्षा मागे घेतल्यानंतर ही घटना घडली. गायक मुसेवाला यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या हत्येचे कनेक्शन तिहार तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी जोडले गेले होते. कॅनडात बसलेल्या बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्ट, नंतर व्हिडिओ संदेश देऊन या हत्याकांडाची जबाबदारी घेतली. काही दिवसांपूर्वी मुसेवाला हत्येचा मुख्य सूत्रधार सचिन बिश्नोई याला अझरबैजानमध्ये अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com