औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) शहरातली एक प्रसिद्ध युट्युबर मुलगी काल हरवली आणि आज सापडलीही. पण तिच्या बेपत्ता होण्याने खळबळ उडाली होती. कारण अवघ्या १५-१६ वर्षाच्या त्या मुलीच्या एकेका व्हिडिओला लाखो व्ह्यूज आहेत. इतकंच नाही तर तिचे व्हिडिओ पाहण्यासाठी, तिच्याशी कनेक्ट होण्यासाठी नेटफलिक्स, अॅमेझॉनच्या सबस्क्राईब प्लानपेक्षाही जास्त पैसे मोजावे लागतात. बेपत्ता झाल्यापासून ते आता सापडल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्रसिद्ध होण्यासाठी तिने हे मुद्दाम तर केलं नाही ना? असा संशय व्यक्त केला जातो आहे. (Youtuber Bindass kavya Found News)
औरंगाबाद शहरातील पडेगाव येथे राहणारी ही काव्या प्रसिद्ध युट्युबर आहे. शुक्रवारी आई-वडिलांबरोबर वाद झाल्यामुळे घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी छावणी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. आज सकाळी पोलीस सहकार्य करत नसल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी दिली. त्यानंतर हा विषय प्रसार माध्यमांमध्ये अधिक गंभीर घेतला गेला. औरंगाबादचे छावणी पोलीस, शहर सायबर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शनिवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास तिला शोधले. इटारसी ते भोपाळ दरम्यान रेल्वेमध्ये रेल्वे पोलिसांना ती सापडली आणि तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रु तरळले.
बिंदास काव्या ही दररोज यूट्यूबवर (Youtube) आपले वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असते. त्यातल्या एकेका व्हिडिओला लाखो तर काही व्हिडिओंना कोटींच्यावर व्ह्यूज आहेत. थोडके-थोडेथोडके नाही तर या छोट्याशा मुलीला 43 लाख 50 हजार सबस्क्रायबर्स आहेत. त्यात आतापर्यंत तिला 168 कोटी 56 लाख 98 हजार 558 व्ह्यूज आहेत. त्यातून तिला लाखो रुपये मिळत असल्याचं बोललं जातंय.
काव्या आपल्या यूट्यूब कम्युनिटी मेंबरशीपमधून लाखो रुपये कमवत असल्याचा अंदाज आहे. तिच्याशी कनेक्ट राहण्यासाठी यूजर्सना पैसे मोजावे लागतात. याचे दर हे एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मपेक्षाही जास्त आहेत. काव्याला जर यूट्यूबवर सपोर्टर म्हणून जॉईन करायचे असेल तर महिन्याला 89 रुपये मोजावे लागतात. काव्याचा जर फॅमिली फ्रेंड व्हायचे असेल तर 159 रुपये महिना लागतात. जर काव्याचा माय सुपर फ्रेंड व्हायचा असेल तर 299 रुपये महिन्याला मोजावे लागतात. आणि जर काव्याचा सुपर लव्ह व्हायचं असेल तर तब्बल 799 महिन्याला मोजावे लागतात. म्हणजेच नेटफलिक्स, अॅमेझॉनला सबस्क्राईब करायला जितके पैसे लागतात, त्यापेक्षाही जास्त पैसे तिला मोजावे लागतात.
शुक्रवारी औरंगाबादहून लखनऊला निघालेली काव्या इटारसी ते भोपाळ दरम्यान रेल्वेत सापडली. ती लखनऊला तिच्या मूळ घरी जात असल्याचं तिच्या आई-वडिलांनी सांगितलं. विशेष म्हणजे तिचे आई-वडीलसुद्धा लखनऊच्या दिशेने आपल्या स्वतःच्या कारने निघाले होते, पण वाटेतच त्यांना काव्याची सापडल्याची बातमी कळली. यानंतर यूट्यूबवर कोटी कोटी व्ह्यूज असलेली बिंदास काव्या काही तासातच चर्चेत आली. टीव्ही चॅनल्सवर, यूट्यूबवर, व्हाट्सअॅपवर तिच्या बातम्या शेअर केल्या गेल्या. या काळात तिच्या youtube पेजवर लोकांच्या व्यूहजच्या उड्या पडल्या. आज, शनिवारी सकाळी काव्याच्या यूट्यूब चॅनेलवर 43 लाख 30 हजार सबस्क्राईब होते. आता दिवसातल्या 6 तासातच तिचे एकूण 43 लाख 60 हजार सबस्क्राईब झाले म्हणजे. सहा तासात 30 हजार सबस्क्राईब वाढले आहेत.
प्रसिद्धीझोतात आलेली काव्या घरातून का निघून गेली होती? नेमकं आई-वडिलांशी वाद काय झाला होता? आणि तिने इतक्या टोकाचे पाऊल का उचललं होतं? याचा तपास पोलीस करतायत. शिवाय खरंच ती रागारागाने घरातून निघून गेली होती का? की प्रसिद्धीसाठी सर्वांनी मिळून केलेला बनाव तर नाही ना? अशी चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.