Brahmastra : बायकॉट ट्रेंड असूनही 'ब्रह्मास्त्र'ने रचला इतिहास; पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

मल्टिप्लेक्स तसेच सिंगल थिएटर्समध्ये 'ब्रह्मास्त्र'ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Brahmastra
Brahmastra Saam Tv
Published On

मुंबई : बॉलिवूडचा सुपरहिट अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून जबरदस्त चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे चांगले रिव्ह्यू आणि रेटिंग मिळाले नसले तरी यानंतरही सर्वांच्या नजरा चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर खिळल्या होत्या. चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडे पाहता हा चित्रपट धमाकेदार कमाई करेल असे मानले जात होते.

Brahmastra
Honey Singh Divorce: घटस्फोटानंतर पत्नीला हनी सिंग देणार एवढी मोठी रक्कम!

विशेष म्हणजे 'ब्रह्मास्त्र' हा बिगबजेट चित्रपट कोणत्याही सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झालेला नाही. असे असतानाही चित्रपटाच्या क्रेझमुळे पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची झुंबड उडाली होती. चित्रपटाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून अंदाज लावला जाऊ शकतो की या चित्रपटाने कोरोना महामारीपूर्वी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे.

Brahmastra
अभिनेत्री काजोल 'OTT' प्लॅटफॉर्मवर झळकणार, 'The Good Wife' वेबसीरिजमधून लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मल्टिप्लेक्स तसेच सिंगल थिएटर्समध्ये 'ब्रह्मास्त्र'ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका इंटरटेनमेंट वेबसाईट अहवालानुसार, सुरुवातीच्या ट्रेंडवरून अंदाज लावला जात आहे की, चित्रपटाने ३६.५० कोटी ते ३८.५० कोटींपर्यंत कमाई केली आहे. मात्र, हे फक्त अंदाजे आकडे आहेत आणि चित्रपटाची खरी कमाई अद्याप समोर आलेली नाही.

ब्रह्मास्त्रने पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये 'संजू', 'टायगर जिंदा है' आणि 'धूम ३' ला मागे टाकले. Panademic नंतर, दिवाळी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली. या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, 'भूल भुलैया २' हा आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट होता, ज्याने पहिल्या दिवशी १४.११ कोटी कमावले. अशाप्रकारे 'ब्रह्मास्त्र' 'भूल भुलैया २' च्या खूप पुढे गेला आहे. ब्रह्मास्त्रच्या ओपनिंगने जशी जबरदस्त सुरुवात केली आहे. त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट ३ दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com