

Chandrakant Patil: राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून मोठा वाद सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. हा वाद शांत होत नाही तोच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल एक वक्तव्य केलं आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. (Chandrakant Patil Latest News)
तुम्ही म्हणाल तो इतिहास चालणार नाही...
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही कसे मूर्ख आहात हे राज्यातील जनता तुम्हाला मतदानातून दाखवून देईल, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना पुढे ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड नवीन इतिहास लिहित आहेत. मात्र तुम्ही म्हणाल तो इतिहास, असं चालणार नाही. इतिहास जो आहे तोच राहील. काही म्हटलं तरी तुमच्या मतांना सहमती देणारे फार कमी असतील. त्यामुळे तुम्ही चूकीचे कसे आहात, किती मूर्ख आहात, तुम्ही इतिहास बदण्याच्या प्रयत्नात आहात हे सर्व काही जनता मतदानावेळी तुम्हाला दाखवून देईल.'
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
अजित पवारांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. त्यांना प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबविषयी वक्तव्य केले. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेऊन त्यांचे डोळे काढण्यात आले होते. त्याच ठिकाणी बाजूला विष्णूचं एक मंदिर होतं. औरंगजेब जर हिंदूद्वेष्टा असता तर त्याने ते मंदीर देखील फोडले असते, अशा प्रकारचं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं.
या मुद्द्यावर आव्हाडांनी पुढे सत्ताधाऱ्यांना उत्तर देत म्हटले की, 'छत्रपती संभाजी महाराजांना सर्वात जास्त बदनाम करणारे कोण? हे सर्वांना माहित आहे. ते क्रूर सुलतानाविरोधात लढले मात्र तत्कालीन आणि समकालीन इतिहासात त्यांना धर्मवीर म्हणून संबोधित केले गेले नाही. एम. एस. गोवळकर यांना मिया गोवळकर म्हणायचं का? सावरकर यांना मिया सावरकर म्हणायचं का?, असे प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.