Jitendra Awhad Statement : जितेंद्र आव्हाड पक्षात एकाकी; प्रभू श्रीरामाबद्दलच्या वक्तव्यामुळे अडचणीत वाढ

Jitendra Awhad News Update : बोलताना सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर रोहित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.
Jitendra Awhad
Jitendra Awhadsaam tv

Mumbai News :

राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. विरोधकांसोबत आपल्याच पक्षातील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आपल्या वक्तव्यामुळे पक्षात एकाकी पडल्याची चित्र निर्माण झालं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ते वक्तव्य वैयक्तिक आहे. मात्र बोलताना सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर रोहित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ : जितेंद्र आव्हाड यांनी काय सांगितले होते?

Jitendra Awhad
Sunil Tatkare: जितेंद्र आव्हाड मोठे शास्त्रज्ञ; श्रीरामावरील वक्तव्यावरून अजित पवार गटाने लगावला टोला

काय म्हणाले रोहित पवार?

आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढावून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, महिलांची असुरक्षितता, शेतमालाला भाव नसणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणे, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची गरज आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं. (Latest News)

देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करु नये, पण देव धर्माच्या नावावर जो राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजेय अशी एक नागरिक म्हणून झाली भावना आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

Jitendra Awhad
Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

राजेश टोपे काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य असल्याने त्यांनी ते विचार मांडले. पक्षाचा आणि या वक्तव्याचा काही संबंध नाही. सगळ्यात धारदार शस्त्र म्हणजे आपली जीभ आहे. त्यामुळे बोलताना सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com