Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा हादरा, विश्वासू शिलेदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार

Vijay Bhambale : जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यात राजकीय संतुलनात मोठा बदल घडू शकतो.
Ajit pawar
Ajit Pawar Saam tv
Published On

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अजित पवार यांनी काका शरद पवार यांना जोरदार धक्का दिला आहे. परभणीमधील माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे. भांबळे आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भांबळे यांना अजित पवार यांचे विश्वासू म्हटले जाते. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भांबळे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी त्यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

साल २०१४ ते २०१९मध्ये जिंतूर मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या आमदार विजय भांबळे यांना २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. विजय भांबळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू म्हणून समजले जात होते. मात्र २०१९ च्या पराभवानंतर भांबळे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी त्यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit pawar
Ajit Pawar : अशी वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न, ठाकरे बंधूंच्या एकीआधीच महायुतीचा मास्टरस्ट्रोक; अजित पवार म्हणाले...

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथील महिला विकास मंडळ सभागृह नरिमन पॉईंट येथे भव्य असा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. माजी आमदार विजय भांबळे यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर परभणी जिल्ह्यात शरद पवार गटाला चांगलाच धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस शरद पवार गटामधून अजित पवार गटात मोठ्याप्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी देखील शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांकडे जाणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Ajit pawar
Sharad Pawar Setback : भाजपचा शरद पवारांना जोरदार धक्का, आमदारकीचा उमेदवार साथ सोडणार

गेल्या काही महिन्यांपासून भांबळे यांच्या पक्षांतर बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. परंतु विजय भांबळे यांनी स्पष्टपणे कधीच याचा खुलासा केला नाही. पण येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अजित पवार गटात प्रवेश करू शकतात हे मात्र निश्चित होते. भांबळे यांच्या कार्यकर्त्यांची देखील हीच इच्छा होती. मागील महिनाभरात अजित पवार हे परभणी जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची चर्चा होती आणि या दौऱ्यातच विजय भांबळे हे भव्य असे शक्ती प्रदर्शन करून प्रवेश करतील असे बोलले जात होते. पण अजित पवारांचा परभणी दौरा झालाच नाही आणि आता पावसाळी अधिवेशन सुरू झाले असल्याने अजित पवारांचा लवकर परभणी जिल्हा दौरा शक्य नसल्याने माजी आमदार विजय भांबळे हे आज आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर तशा प्रकारच्या पोस्ट आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून टाकल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com