Monsoon Session 2023: अहो जयंत पाटील आमचं तुमच्याकडेच लक्ष आहे, अजित पवारांचं सूचक विधान

आमच्या दोघांचं लक्ष तुमच्याकडं आहे पण तुमचचं आमच्याकडं लक्ष नाही त्यावर मी काय करु, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं.
Monsoon Session 2023
Monsoon Session 2023Saam TV
Published On

Jayant Patil On Ajit Pawar: विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांधील सर्व महत्वाच्या नेत्यांची भाषणे झाली. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर भाष्य केले. तसेच जयंत पाटील यांनी अजित पवारांवर चांगलाच निशाणा साधला. अजित पवारांनी देखील यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.(Latest Marathi News)

काय म्हणाले जयंत पाटील

विरोधी पक्ष नेत्यांचं महत्व इतकं आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येऊन आमदारांकडे लक्ष देण्याएवजी विरोधी पक्ष नेत्यांच्या संदर्भात होणाऱ्या वर्णनाच्या भाषणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं जयंत पाटील सभागृहातील आपल्या भाषणात म्हणाले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगेचच सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

Monsoon Session 2023
Maharashtra Politics Disqualification News : आमदार अपात्रतेबाबत मोठी बातमी! अपात्रतेचा निकाल कधी?

काय म्हणाले अजित पवार?

आमच्या दोघांचं लक्ष तुमच्याकडं आहे पण तुमचचं आमच्याकडं लक्ष नाही त्यावर मी काय करु, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला होता.

पुढे जयंत पाटलांनी (Jayant Patil) अजित पवारांवर आणखी टोलेबाजी केली. मुख्यमंत्री विचलीत न होता लक्ष देत सर्वांची भाषणे ऐकत आहेत. पण दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर १ कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर २ कोण? जयंत पाटलांच्या या टोलेबाजीने सभागृहात काहीवेळ हस्यास्पद वातावरण राहिलं.

Monsoon Session 2023
Maharastra Politics : बावनकुळेंचे विधान, भुजबळांचा पलटवार...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com