Jay Pawar Wedding: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार अडकले विवाहबंधनात; आत्या सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास PHOTO

Supriya Sule Jay Pawar Rutuja Patil Wedding Photos: जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा काल पार पडला. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.
Jay Pawar Wedding
Jay Pawar WeddingSaam Tv
Published On
Summary

अजित पवार यांचे पुत्र जय पवारांचा विवाहसोहळा

जय पवार आणि ऋतुजा पाटील अ़डकले विवाहबंधनात

बहरिन येथे पार पडला शाही विवाहसोहळा

आत्या सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. काल जय पवार आणि ऋतुजा पाटील हे विवाहबंधनात अडकले. हा शाही विवाहसोहळा बहरिनमध्ये पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब बहरिनला गेले होते. आता जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नातील फोटो समोर आले आहे. जय पवार यांची आत्या म्हणजेच सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Jay Pawar Wedding
Yugendra Pawar Wedding: पवार कुटुंबात सनई-चौघडे वाजले! युगेंद्र पवार विवाहबंधनात अडकले; लग्नाचे UNSEEN फोटो पाहा

जय पवारांच्या लग्नासाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट (Supriya Sule Share Photos of Jay Pawar Wedding)

जय पवार यांच्या लग्नाला सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रतिभा पवार उपस्थित नव्हते. सुप्रिया सुळेंनी या नवीन जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया यांनी जय यांच्या वरातीचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये जय पवारांसोबत रेवती सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार दिसत आहेत. जय पवारांचा विवाहसोहळा बहरिनमध्ये पार पडला. बहरिनमध्ये तीन दिवस या विवाहसोहळ्यानिमित्त कार्यक्रम होते. ४, ५ आणि ६ डिसेंबर रोजी लग्नाचे कार्यक्रम आहेत.

अजित पवारांनी मुलाच्या लग्नात केला डान्स (Ajit Pawar Dance Video At Jay Pawar Wedding)

सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अजित पवार वरातीत डान्स करताना दिसत आहे. अजित पवारांसोबत रोहित पवार, युगेंद्र पवारदेखील दिसत आहेत. पवार कुटुंबियांनी या लग्नात ढोल-ताशांवर ठेका धरल्याचे दिसत आहे.

Jay Pawar Wedding
Jay Pawar Wedding: अजितदादांच्या घरी लगीनघाई! लेक जय पवारांचं लग्न परदेशात होणार; कसा असणार विवाहसोहळा? पत्रिका पाहा

जय पवारांची बायको आहे तरी कोण? (Jay Pawar Wife)

जय पवारांच्या बायकोचं नाव ऋतुजा पवार आहे.ऋतुजा या फलटणच्या आहेत. सोशल मिडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची त्या कन्या आहेत. या लग्नसोहळ्याला संपूर्ण पवार आणि पाटील कुटुंब उपस्थित होते. या दोन्ही कुटुंबांनी फक्त ४०० लोकांनी लग्नासाठी बोलावले होते.

Jay Pawar Wedding
Jay Pawar Wedding: जय पवारांच्या लग्नात अजित दादांचा झिंगाटवर डान्स, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com