जालन्यात OBC जनगणनेसाठी 'जनजागरण' अभियान

केंद्र सरकारने ओबीसी, व्हिजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाची जनगणना करावी, ओबीसींचा इम्परिकल डाटा राज्य सरकारला द्यावा अशी मागणी या जनजागरण अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली.
जालन्यात OBC जनगणनेसाठी 'जनजागरण' अभियान
जालन्यात OBC जनगणनेसाठी 'जनजागरण' अभियानलक्ष्मण सोळुंके
Published On

जालना : जालन्यात आज ओबीसी, व्हिजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाचे राज्यस्तरीय मराठवाडा विभागीय जनजागरण अभियान संपन्न झाले यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.

हे देखील पहा -

जालना शहरातील पाठक मंगल कार्यालयातून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. ओबीसींची जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हे अभियान घेण्यात आले आहे. या अभियानाला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध समाज घटकातील नेते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

केंद्र सरकारने ओबीसी, व्हिजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाची जनगणना करावी, ओबीसींचा इम्परिकल डाटा राज्य सरकारला द्यावा अशी मागणी या जनजागरण अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली.

जालन्यात OBC जनगणनेसाठी 'जनजागरण' अभियान
भंडारा आगारातील एसटी बसेस हायटेक VTS यंत्रणेसह सज्ज!

जनगणना न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा यावेळी जनजागरण अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकाराला व राज्यसरकारला देण्यात आला आहे.दरम्यान ओबीसी जनगणना अभियान मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार असल्याची माहिती अभियान प्रमुखांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com