याेद्धा पुन्हा मैदानात! रत्नागिरीसह सिंधुदूर्गात सारे सज्ज

police
police

रत्नागिरी/सिंधूदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जय्यत तयार केली आहे. याेद्धा पुन्हा मैदानात अशा स्वरुपाचे फलक रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग शहारत झळकत आहेत. मंत्री राणे narayan rane हे रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जन आशीर्वाद यात्रेस jan aashirwad yatra प्रारंभ करणार आहेत. भाजप आणि सेना shivsena कार्यकर्त्यांत काेणताही प्रकारचा वाद हाेऊ नये यासाठी पाेलिस विभाग देखील सज्ज झाला आहे.

या यात्रेच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुवव्यस्था राखण्यासाठी नाशिक, नवी मुंबई या भागातील पाेलिसांचे police जलद कृती दल quick response team रत्नागिरीत दाखल झाले आहेत. याबराेबरच लांजा व अन्य महत्वाच्या ठिकाणी पाेलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरीतून सुरु हाेणारी आजची जन आशीर्वाद यात्रा सायंकाळी सिंधुदुर्गात पाेहचणार आहे. राणेंच्या स्वागतासाठी सिंधुदूर्गात माेठ्या संख्येने फलक लावण्यात आले आहेत. राणेंच्या स्वागताची तयारी कार्यकर्त्यांनी जोमात केली आहे. या भागात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी भाजप आणि सेना या दाेन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना पाेलिसांनी नाेटीसा बजावण्यात आल्या आहेत.

police
'त्या' वेळी सर्व पक्षीय प्रतिनिधींनी यावे; संभाजीराजेंचे आवाहन

या यात्रा कालावधीत नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली तर शिवसेना जन आशीर्वाद यात्रा रोखणार असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. त्याचपार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलिस विभाग आणि जिल्हा प्रशासन घेत आहे. आज सकाळी पाेलिसांनी पुन्हा संचलन केले.

निलेश राणे यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून याेद्धा पुन्हा मैदानात अशा स्वरुपाचे ट्विट करुन जन आशीर्वाद यात्रेसाठी आम्ही सज्ज आहाेत असे सूचित केले आहे. राणे समर्थकांनी देखील साेशल मिडियावर याेद्धा पुन्हा मैदानात हे छायाचित्र व्हायरल करुन नेत्याच्या जन आशीर्वाद यात्रेस शुभेच्छा देत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com