Maratha Reservation: 'आरक्षणासाठी रक्त सांडायलाही मागे सरणार नाही...' तरुणाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहले पत्र

Jalna News: आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक युवक आपले रक्त सांडायला मागे सरणार नाहीत... असा इशाराही या पत्रामधून देण्यात आला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV

Maratha reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्यात यावा, अशी मागणी करत परतूर तालुक्यातील युवकाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहले आहे.

Eknath Shinde
Nana Patekar News: 'वाघनखे आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...' अभिनेते नाना पाटेकर यांचा भाजपवर प्रहार; नेमकं काय म्हणाले?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत परतूर तालुक्यातील खडके गावच्या गजानन चवडे या युवकाने (Partur Jalna) आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा समावेश ओबीसीत करण्यात यावा.. अशी मागणी या पत्रामधून करण्यात आली आहे.

स्वत:च्या समाजासाठी आज मराठा युवक जागा झाला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर अनेक युवक आपले रक्त सांडायला मागे सरणार नाहीत. सर्व समाजाची भावना लक्षात घेऊन सरकारने मराठा समाजाच्या मागणीचा गांभियाने विचार करावा, असा इशाराही या पत्रामधून देण्यात आला आहे.

Eknath Shinde
Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ३ दिवस तुफान पाऊस बरसणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMDचा अंदाज

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा बारावा दिवस आहे. मुंबईतील बैठकीनंतर राज्यसरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला आले आहे. त्यांच्याकडून सरकारसोबत झालेल्या बैठकीची माहिती जरांगे पाटील यांना देण्यात येत आहे. आज जरांगे पाटील उपोषण मागे घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे... (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com