Samruddhi Mahamarg : जालना- नांदेड समृद्धी महामार्गाचं मुल्यांकनासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; विरोध करणाऱ्या काँग्रेस आमदाराचा निषेध

Jalna News जालना- नांदेड समृद्धी महामार्गाचं मुल्यांकनासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन; विरोध करणाऱ्या काँग्रेस आमदाराचा निषेध
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv
Published On: 

जालना : जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचं मुल्यांकन लवकर सुरु करावं या मागणीसाठी जालन्यातील (Jalna) शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन (samruddhi Mahamarg) केले आहे. तसेच यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांचा निषेध देखील केला. (Maharashtra News)

Samruddhi Mahamarg
Jalgaon Crime News : भाड्याची खोली घेत मुलीवर अत्याचार; मुलासह दोन महिला ताब्यात

जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाचं काही भागाचं मुल्यांकन झालं. त्यासाठी मराठवाड्यातील बहुतांश आमदारांनी त्यासाठी पाठिंबा दिल्याचं पत्रही दिलं. मात्र जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्तित करताना समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी खोटी झाडाची लागवड करत ५०० कोटींचा अनुदान घोटाळा अधिकारी यांनी मिळून केल्याचा आरोप केला आहे. तसेच या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. 

Samruddhi Mahamarg
Dhule News : संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध; महात्मा फुले समता परिषदेचे आंदोलन

काँग्रेस आमदाराचा निषेध 

संतप्त झालेल्या (Farmer) शेतकऱ्यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचा जाहीर निषेध करत समृद्धी बाधित शेतकऱ्यांचे मूल्यांकन तात्काळ करुन शेतकऱ्यांच्या खात्यात मोबदला जमा करावा; अशी मागणी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन ही दिले आहे. यावेळी शेतकऱ्यांना चोर म्हणणाऱ्या आमदारांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com