जालना : बदली रद्द करून पुन्हा रुजू झाल्याने काही जणांनी अभियंत्याची डीजे लावून मिरवणूक काढली होती. परवानगी नसताना (Mahavitaran) महावितरण कार्यालयाच्या आवारात डीजे वाजवून मिरवणूक काढत सार्वजनिक शांतता भंग करुन नागरिकांना अडथळा (Jalna News) निर्माण केला. या प्रकरणी अभियंत्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ आणि पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या आदेशानंतर सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Breaking Marathi News)
जालना महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या प्रकाश चव्हाण या अभियंत्याची सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीनंतर एक महिन्यापूर्वी रत्नागिरी महावितरण कार्यालयात बदली करण्यात आली होती. प्रकाश चव्हाण या अभियंत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जिद्दीवर एका महिन्यात ही बदली रद्द करून पुन्हा त्याच पदावर वरिष्ठांना हाताशी धरून आपली बदली करून घेतली. जालना महावितरण कार्यालयात रुजू होण्यासाठी या अभियंत्याने गुत्तेदारांना हाताशी धरून डीजेच्या तालावर वाजत गाजत तब्बल दीड तास मिरवणूक काढली. चित्रपटातील एखाद्या हिरोचा सीनला साजेल अशा पद्धतीने एन्ट्री करत महावितरणच्या (MSEDCL) कन्हैयानगरच्या कार्यालयाच्या परिसरात गुत्तेदारासह डीजेच्या तालावर नाचत गाजत रुजू होण्यासाठी दाखल झाला होता.
दरम्यान या संपूर्ण घटनेची बातमी साम टीव्हीने प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ आणि पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी घटनेची तात्काळ दाखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश सदर बाजार पोलिसांना दिले होते. पोलिसांनी अभियंता प्रकाश चव्हाण याच्यासह ३० जणाविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजून शांतता भंग करुन नागरिकांना अडथळा निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी व महावितरण कर्यालयाच्या आवारात विना परवाना मंडप लावून कार्यक्रम घेत जालना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात लागू केलेल्या कलमाचे ऊल्लघन केल्याप्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणी अधिक तपास पोलिस निरक्षक प्रशांत महाजन हे करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.