Jalna News: भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा मंजूर; शिवप्रेमी तरुणांनी फटाके फोडून जल्लोष

भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा मंजूर; शिवप्रेमी तरुणांनी फटाके फोडून जल्लोष
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On: 

जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मजूर केला. ही बातमी कळताच जालन्यातील भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे गावातील शिवप्रेमी तरुणांनी फटाके फोडत छत्रपती शिवाजी महाराज की जय, सावत्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले यांचा विजय असो अशा घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला. (Live Marathi News)

Jalna News
Ambadas Danve: बरं झालं भाजपच्या एजंटची राज्यपाल पदावरून हकालपट्टी झाली; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

शिवप्रेमी तरुणांनी शेतात फटाके फोडून हा जल्लोष साजरा केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून वारंवार होत असलेल्या महापुरुषांबद्दल आपमानस्पद वक्तव्यावरून शिवप्रेमीच्या वतीने संताप व्यक्त केल्या जात होता. राज्यपाल (Jalna News) यांच्या या भूमिकेमुळे त्यांना केंद्र सरकारने परत बोलावून घेण्याची मागणी ही महाराष्ट्रातील जनतेकडून केली जात होती.

बातमी कळताच जल्‍लोष

या दरम्‍यान आज भगतसिंग कोश्‍यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याची बातमी कळताच या शिवप्रेमी तरुणांनी शेतात फटाके फाडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषत हा आनंद व्यक्त करा जल्लोष साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com