अक्षय शिंदे
जालना : महाविकास आघाडीच्या राज्यात दोन तृतीयांश जागा निवडून येणार असल्याचा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. महायुतीच्या राजकारणाचा स्थर घसरला आहे; असं म्हणत या निवडणुकीत महायुती निवडून येईल की नाही? याचा त्यांना विश्वास नाही; अशी टीका काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी महायुती सरकार वर केली.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून (Jalna) जालन्यात महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ ते आले असता माध्यमांशी संवाद साधतांना अमित देशमुख (Amit Deshmukh) बोलत होते. महायुतीचा जाहीरनामा काँग्रेसने चोरला असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. याला अमित देशमुख यांनी उत्तर देत हा विनोद असल्याचं म्हटले आहे.
२५ ला माविआ सरकारचा शपथविधी
महायुती जातीय ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप करत सत्तेचा दुरुपयोग करून फोडाफोडी करण्यात त्यांना यश आलं, अशी टीका देखील देशमुख यांनी भाजपावर केली. दरम्यान जनतेच्या मनातील सरकारं (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडी स्थापन करेल. २५ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी होईल; असा दावा अमित देशमुख यांनी यावेळी बोलतांना केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.