Bail Pola Festival : "आपणा भिडू बच्चू कडू", कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने बैलपोळ्यानिमित्त सजवटीतून मांडली भावना

Jalna News : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील शेतकऱ्याने बैलपोळ्याच्या दिवशी आपल्या बैलावर सजावट करून "आपणा भिडू बच्चू कडू" "सातबारा कोरा करा" अशी कर्जमाफीची ठळक मागणी केली आहे. हा अनोखा प्रकार गावात चर्चेचा विषय ठरला आहे.
Bail Pola Festival : "आपणा भिडू बच्चू कडू", कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने बैलपोळ्यानिमित्त सजवटीतून मांडली भावना
Jalna NewsSaam Tv
Published On
Summary
  • परतूर तालुक्यातील शेतकऱ्याने बैलपोळ्याच्या दिवशी बैल सजवून कर्जमाफीची मागणी केली.

  • "आपणा भिडू बच्चू कडू" आणि "सातबारा कोरा करा" असे संदेश बैलावर लिहिले गेले.

  • गावात या प्रकाराची चर्चा रंगली असून सोशल मीडियावर हा प्रकार व्हायरल झाला.

  • राज्यभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा आवाज या अनोख्या सजावटीतून व्यक्त झाला.

अक्षय शिंदे, जालना प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सोयंजना गावात बैलपोळ्याच्या सणानिमित्त एक अनोखा प्रकार घडला आहे. राज्यभरातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असून कर्जमाफीची मागणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील एका शेतकऱ्याने बैलपोळ्याच्या दिवशी आपल्या बैलावर वेगळी सजावट करून समाजमाध्यमे आणि परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शेतकऱ्याने आपल्या बैलावर फुलांच्या हारांसोबतच पोस्टरच्या स्वरूपात "आपणा भिडू बच्चू कडू" असे मोठे अक्षरात लिहिले असून "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा" अशी ठळक मागणी नमूद केली आहे. बैलावर केलेली ही सजावट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आणि या शेतकऱ्याच्या भूमिकेचे कौतुक केले. बैलपोळ्याच्या पारंपरिक सणात अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या गेल्याने हा सण वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.

Bail Pola Festival : "आपणा भिडू बच्चू कडू", कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने बैलपोळ्यानिमित्त सजवटीतून मांडली भावना
Jalna Breaking News : जालन्यात मुसळधार पावसाचा कहर, पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला

मिळालेल्या माहितीनुसार, परतूर तालुक्यातील हा शेतकरी गेल्या काही वर्षांपासून पिकांना योग्य दर न मिळणे, पिकविम्याच्या समस्या आणि कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहे. शेतकऱ्यांना सतत कर्जाच्या जाचातून मुक्ती मिळावी यासाठी त्यांनी बैलावर सजावट करून आपली मागणी मांडली. "कर्जमाफी करा, सातबारा कोरा करा" हा संदेश त्यांनी लोकांसमोर ठेवला.

Bail Pola Festival : "आपणा भिडू बच्चू कडू", कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने बैलपोळ्यानिमित्त सजवटीतून मांडली भावना
Jalna : अवैध विक्रीसाठी जात असलेला गुटखा जप्त; बदनापूर पोलिसांची कारवाई, ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी भावनेचा सण मानला जातो. शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालून, त्यांना सजवून पूजा करतात आणि त्यांच्या मेहनतीची कदर करतात. मात्र, यंदा या शेतकऱ्याने आपल्या सणाला वेगळाच रंग दिला. सजावटीतून सामाजिक संदेश देत त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार गावात चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावरही या सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मनातील भावना या एका सजावटीतून प्रभावीपणे व्यक्त झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com