Jalna Breaking News : जालन्यात मुसळधार पावसाचा कहर, पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला

Jalna News : जालना जिल्ह्यात पावसाचा जोर सुरू कायम असून मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळील पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. या घटनेमुळे कानडी गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Jalna Breaking News
Jalna Breaking News Saam Tv
Published On
Summary
  • जालना जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे देवठाणा गावाजवळील पूल वाहून गेला.

  • या घटनेमुळे कानडी गावाचा संपर्क तुटला असून अनेक गावकरी अडकले आहेत.

  • पूल निकृष्ट दर्जाचा होता अशी ग्रामस्थांची पूर्वीपासून तक्रार होती.

  • जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची नोंद झाली असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या राज्यभरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा फटका राज्याला बसला आहे. शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली, तर काहींच्या घरी पावसाचे पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. अशातच आता जालना जिल्ह्यात धोधो पडणाऱ्या पावसाने मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळील पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्याने गावचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जालना जिल्ह्यात काल सर्वदूर मुसळधार पाऊस पडला . या पावसामुळे मंठा तालुक्यातील देवठाणा गावाजवळील ओढ्याला पूर आल्याने पूल वाहून गेला आहे. मंठा तालुक्यातील कानडी येथून देवठाणामार्गे उस्वद,तळणी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल मुसळधार पावसाने वाहून गेल्याने कानडी गावचा संपर्क तुटला.

Jalna Breaking News
Jalna : जालन्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर, खरिप पिकांचं मोठं नुकसान | VIDEO

यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या तक्रारी यापूर्वीच ग्रामस्थांनी केल्या होत्या. वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आता या कामाचा दर्जा पावसामुळे उघड झाला आहे. दरम्यान आता तरी प्रशासन गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

जालन्यात आज पावसाची स्थिती काय ?

जालना जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. चार दिवसांमध्ये जिल्ह्यात ५४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर जिल्ह्यातील जालना बदनापूर आणि जाफराबाद तालुक्यातील अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली आहे.

Q

देवठाणा गावाजवळील पूल का वाहून गेला?

A

सततच्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेला.

Q

या पूलाच्या निकृष्ट कामाबाबत पूर्वी तक्रारी होत्या का?

A

हो, ग्रामस्थांनी याआधीच पूलाच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या होत्या.

Q

या घटनेचा नागरिकांवर काय परिणाम झाला?

A

पूल वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Q

सध्या जालना जिल्ह्यात हवामान कसे आहे?

A

जालना जिल्ह्यात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी असून सतत चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com