मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सोमवारी (४ मार्च) सायंकाळच्या सुमारास घडली. समर्थ परशुराम तायडे (वय ५ वर्ष रा.आमठाणा,ता.सिल्लोड) असं मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्राप्त माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील (Sillod News) आमठाणा येथे राहणारे तायडे कुटुंबिय नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी भोकरदन तालुक्यातील (Bhokardan News) कुंभारी गावात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत ५ वर्षाचा चिमुकला समर्थ देखील होता.
दरम्यान, तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तायडे कुटुंब सोमवारी ४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते. त्याचवेळी नातेवाईकांच्या मुलासोबत खेळत असताना चिमुकला समर्थ याने मोबाईलची खराब झालेली बॅटरी कानाला लागली. (Latest Marathi News)
त्याच क्षणी भयानक स्फोट झाला. या स्फोटात समर्थच्या कानाला तसेच बोटाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समर्थला तपासून मृत घोषित केले.
नातेवाईकाच्या तेराव्यासाठी आलेल्या तायडे कुटुंबियांवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. लहान मुलांच्या हातात मोबाइल देताना काळजी घ्यायला हवी, तसेच फोनवर बोलत असताना मोबाइल चार्जिंगला लावू नये, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.
Edited by - Satish Daud-Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.