Jalna News : बायको माहेरी गेली, परत आणा; जालन्यात चक्क टॉवरवर चढला नवरा

दारुच्या नशेत तब्बल 4 तास या तरुणाने टॉवरवर मुक्काम ठोकला मुक्काम
Jalna badnapur News
Jalna badnapur NewsSaam TV
Published On

जालना : बायको मला सोडून माहेरी गेली, तिला परत आणा अन् मला घरकूल द्या, या मागणीसाठी एक तरुण चक्क दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर (Mobile Tower) चढला. जालन्यात (Jalna) जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या दाभाडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. गणपत बकाल असं दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आपल्या मागणीसाठी या तरुणाने दारुच्या नशेत तब्बल 4 तास टॉवरवर मुक्काम ठोकल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. (Jalna Crime News)

Jalna badnapur News
मोठी बातमी! नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी बचावले

टॉवरवर चढलेल्या या तरुणाला खाली उतरवण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न केले. मात्र तरी देखील तो खाली उतरला नाही. अखेर 4 तासांच्या नंतर सदरील तरुण स्वत:हून खाली उतरला. तेव्हा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. माहितीनुसार, बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावातील गणपत बकाल नामक तरुण हा बुधवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मोबाईल टॉवरवर चढला.

माझी बायको माहेरी गेली, तिला परत आणा, तसंच मला घरकूल मिळवून द्या अशी मागणी या तरुणाने केली. सदरील तरुणाने दारूच्या नशेत हे धक्कादायक कृत्य केलं. याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. (Badnapur Taluka News)

Jalna badnapur News
Beed : कोद्री नदीच्या पुलावरून टॅंकर काेसळला; चालक सुखरुप

गावकऱ्यांनी या तरुणाला टॉवर वरून खाली उतरण्यासाठी खुप प्रयत्न केले.पोलिसांचा फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला. मात्र पोलिसांनी खाली उतरण्याचं आवाहन करून सुद्धा तो खाली आला नाही. त्यानंतर मात्र अग्निशमन दलाचे पथक मागविण्यात आले मात्र तेही त्याच्यासमोर हतबल झाले.

गणपत हा दारूच्या नशेत असल्यानं अनेकांनी त्याची मजा घेतली. "तुला आमदार करतो, खाली उतर" अशी गळ घातली. पण तरीही तो खाली उतरण्यास तयार झाला नाही. दरम्यान, तब्बल 4 तासाने गणपत हा टॉवर खाली उतरला. त्यानंतर बदनापूर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com