Jalna SP Tushar Doshi: जालना लाठीमार प्रकरणात सरकारची मोठी कारवाई; जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर

Jalna SP Tushar Doshi: जालना लाठीमार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. गृहविभागाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
Jalna SP Tushar Doshi
Jalna SP Tushar DoshiSaam tv
Published On

Jalna News In Marathi

जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील घडलेल्या लाठीमार प्रकरणानंतर राज्यभरात पडसाद उमटत आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून कारवाईची मागणी होत आहे. याचदरम्यान, जालना लाठीमार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. गृहविभागाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. (Latest Marathi News)

जालन्यात मराठा आंदोलक लाठीमार प्रकरणानंतर राज्यभरात पडसाद उमटले आहेत. जालन्यातील घटनेनंतर काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळालं. अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटनेनंतर शिंदे सरकारने कारवाईचे आश्वासन दिले होते. यानंतर गृहखात्याने मोठी कारवाई केली आहे.

Jalna SP Tushar Doshi
CM Eknath Shinde On Jalna Lathi Charge: 'पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, चौकशीनंतर...', जालना लाठीचार्ज प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर या भागात आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या घटनेनंतर जिल्ह्याचे अधीक्षक तुषार दोशी यांचं नाव पुढे आलं. त्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. गृहविभागाने ही मोठी कारवाई केली आहे.

कोण आहेत तुषार दोशी?

तुषार दोशी यांनी पदवी झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर पोलीस भरती झालो. पदवी झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली. त्यानंतर पोलीस खात्यात भरती झालो, तुषार दोशींनी नवी मुंबई पोलीस उपायुक्तपदी असताना एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.

Jalna SP Tushar Doshi
Ajit Pawar Upset : अजित पवार महायुतीत नाराज?, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?

प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करू : मुख्यमंत्री शिंदे

दरम्यान, मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी देखील या कारवाईवर भाष्य केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'जालन्याचे एस पी, अतिरिक्त एस पी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशी झाल्यानंतर निलंबन करावं लागलं तर तीही कारवाई करू. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी देखील करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com