Crime News
Crime NewsSaam tv

Crime News: पत्नीचा खून करून पती फरार; जालन्‍यातील धक्‍कादायक घटना

पत्नीचा खून करून पती फरार; जालन्‍यातील धक्‍कादायक घटना
Published on

जालना : कामानिमित्‍ताने जालन्‍यात वास्‍तव्‍यास असलेल्‍या पतीने पत्नीचा खून (Crime News) केला. यानंतर पती फरार झाल्याची घटना घडली आहे. इंदुबाई किशोर आटोळे असे मृत पत्नीचे नाव आहे. (Live Marathi News)

Crime News
Jalgaon News: धक्‍कादायक..झोपेतच वृद्धेचे कान कापून दागिने लांबविले; रेल येथील रात्रीची घटना

किशोर आटोळे हे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत असून गेल्या पाच महिन्यांपूर्वी ते शहरातील शंकरनगर भागात भाड्याची खोली घेवून राहत होते. किशोर हा सेक्युरिटी गार्डचे शहरात काम करत असल्याची ही माहिती सामोर आली. आज सकाळी त्याने पत्नीच्या डोक्यावर अवजड वस्तूने वार करून खून (Crime) केल्याची धक्कादायक बाब घडली आहे.

आरोपी पतीचा शोध सुरू

पत्नीचा खुन केल्यानंतर तो फरार झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, याप्रकरणी अधिक तपास सुरू केला असून फरार पतीचा ही शोध सुरू केला. या घटनेने शहरात एकच खबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com