Beed Band : जालन्यातील मराठा समाजाच्या आंदाेलकांना बीडकरांचा पाठिंबा, एसटी सेवा ठप्प

maratha kranti morcha latest updates : जालन्यातील घटनेचा निषेध खासदार उदयनराजे भाेसले, संभाजीराजे छत्रपतींसह राज्यातील बहुतांश नेत्यांनी नाेंदविला आहे.
Beed, jalna maratha andolan, maratha reservation
Beed, jalna maratha andolan, maratha reservationsaam tv
Published On

Beed Band News : जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज आरक्षणासाठी (Jalna Maratha Reservation) उपोषण करणाऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (शनिवार) बीड बंदची (beed band) हाक देण्यात आली आहे. जालन्यातील घटनेनंतर अज्ञातांनी एसटी महामंडळाच्या बसला लक्ष केले हाेते. त्यामुळे बीड बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. (Maharashtra News)

Beed, jalna maratha andolan, maratha reservation
Tadoba Online Booking: ताडोबाला जाणार आहात? वाचा ऑनलाईन बुकिंगबाबत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला जालना येथे हिंसक वळण लागल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. राज्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज बीड बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल सुरू झाले आहेत. प्रवासी मिळेल त्या वाहनातून प्रवास करु लागले आहेत.

Beed, jalna maratha andolan, maratha reservation
Teachers Day दिवशी महाराष्ट्रातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर; जाणून घ्या नाराजीचे कारण

खासगी वाहनात मिळेल त्या जागेवर बसून जाण्याची तयारी प्रवाशांनी दाखवली आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनात सात जण बसतात त्या वाहनात जवळपास 15 प्रवासी बसत आहेत. हे चित्र बीड बस स्थानकाच्या परिसरात आज सकाळी पाहायला मिळाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com