जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा विचार सरकार करत आहे. याला सकल (Jalna) ओबीसी समाजाचा विरोध असून या विरोधात आज ओबीसी समाजाच्यावतीने अंबड (Ambad) शहरात विराट महामोर्चा काढण्यात आला. (Latest Marathi News)
जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरात आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. मराठा समाज हा मागास नसून या आधी सुप्रिम कोर्टानं त्यांचे आरक्षण रद्द केले आहे. मात्र तरीही सरकार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देवू पाहत आहे. (Maratha Aarkshan) त्यामुळे सुप्रिम कोर्टाचा अवमान सरकारने करून नये आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये. यासह ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी; या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाची सांगता करण्यात आली. दरम्यान या मोर्चाला हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.