जळगाव : लग्नाचे वय होऊन देखील वडीलांकडून लग्न करून देण्यासंदर्भात कोणताही प्रतिसाद नव्हता. याचा मनात राग धरून मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना यावल (Yawal) तालुक्यातील एका गावात १४ जानेवारीला घडली आहे. (Breaking Marathi News)
पिळोदा खु. (ता. यावल) येथे ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेत रतनसिंग तानसिंग कोळी (वय ७३) यांचा (Crime News) खून झाला आहे. रतनसिंग कोळी हे पत्नी व मुलगा देवानंद यांच्यासमवेत पिळोदा येथे वास्तव्यास होते. (Jalgaon) संशयित देवानंद कोळी याचे लग्नाचे वय होवूनही त्याचे लग्न होत नव्हते. त्यामुळे पिता रतनसिंग यांच्याकडे मुलाने लग्न करून देण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता. मात्र ते टाळाटाळ करीत असल्याने संतप्त होऊन वडिल झोपले असता त्यांच्या डोक्यात कुन्हाडीचे वार करत हत्या केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुलगा पोलिसांच्या ताब्यात
सदरच्या घटनेनंतर गावात खळबळ उडाली. आरोपी मुलाविरोधात सुभाबाई रतन कोळी (वय ६०) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा (Police) दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित देवानंद कोळी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.