भुसावळ (जळगाव) : वरणगांव फॅक्टरीमध्ये रविवार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्राईमिंग विभागात स्फोटक पावडरचा स्फोट झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची कारणे (Varangaon) शोधण्यासाठी चौकशी मंडळांची स्थापना केली आहे. (Maharashtra News)
सध्या सरकारकडून वरणगांव फॅक्टरी खाजगीकरणाचा प्रयत्नात काम वाढविण्याचे सत्र सुरु आहे. याच कारणामुळे अपघात झाल्याचे समजते. फॅक्टरीमध्ये काम वाढीसाठी कामगारांना प्रेशर दिले जात आहे. सवलती बंद होत आहेत. कोणताही ट्रेडमनचा कुठेही वापर होत आहे. धोक्याच्या विभागामध्ये संबंधित ट्रेडमन काम न करता सर्व (Jalgaon News) प्रकारचे कामगारांकडून काम केले जात आहे. वरीष्ठस्तरावर याबाबत दखल घेण्याची गरज आहे असे कामगारांची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
वरणगांव आयुध निर्माणीचे (Bhusawal) सुरक्षा अधिकारी एस. आर. पाटील यांनी रिदम हॉस्पिटलला भेट दिली. तर वरणगांव आयुध निर्माणीचे (जी.एम) ए. के. सिंग यांनी बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल हॉस्पिटलला भेट दिली. त्या दरम्यान यांनी कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम उपचार देण्याचे आश्वासन दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.