World Radio Day: दीडशे रेडिओंचा अनोखा संग्रह; आजही एकतात त्‍यावर गाणे

दीडशे रेडिओंचा अनोखा संग्रह; आजही एकतात त्‍यावर गाणे
World Radio Day
World Radio DaySaam tv
Published On

जळगाव : सतराव्या शतकात रेडिओचा शोध लागला असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष सर्व सामान्य जनतेच्या घरात रेडिओ पोहोचायला १९ वे शतक उजाडले. यानंतरही रेडिओ तंत्रात सुधारणा होत गेले. अगदी मोबाईलमध्ये खिशात घेऊन फिरता येईल अशा लहान आकारात आणि सुधारित तंत्राऱत आता (World Radio Day) रेडिओ मिळू लागला आहे. परंतु, अगदी सुरवातीच्‍या काळातील जुन्‍या रेडिओंचा संग्रह जळगावातील सेवानिवृत्‍त शिक्षकाकडे आहे. (jalgaon news World Radio Day Unique collection of one and a half hundred radios)

World Radio Day
लडकी समजके फ्लॉवर समजे क्‍या, फायर है हम..सोशल मीडियावर पोस्‍टर वॉर

रेडिओचा शोध मार्कोनी आणि जगदीशचंद्र बोस यांनी लावला असला तरी तो एकाच दिवशी लागलेला नाही. विविध टप्प्यात त्यात सुधारणा होत गेल्या आहेत. रेडिओ (Radio) तयार करण्यासाठी विविध गोष्टीचा वापर करावा लागला असल्याने त्याला रेडिओ संच म्हटल जायचे. काळाच्या ओघात त्याच्या तंत्रात मोठे अमुलाग्र बदल घडून आले आणि व्हालचे जागी इलेक्ट्रॉनिक चीप आय. सी. वापरल्या जाऊ लागल्या आणि रेडिओचे नामकरण ट्रांझीस्टर झाल्याचे सतीश पाटील सांगतात ट्रांझिस्टर झाल्यानंतरच रेडिओचा आकार हा लहानात लहान होऊन मोबाईलमध्ये खिशात ठेवता येईल असा झाला आहे. रेडिओचे हे विविध टप्प्यातील सुधारित तंत्र सतीश पाटील यांच्या संग्रहात आपल्याला पाहायला मिळत असते.

भंगार बाजारातूनही केला संग्रह

जळगाव (Jalgaon) शहरातील सेवा निवृत्त शिक्षक सतीश पाटील यांना जुन्या काळातील रेडिओ संग्रह करण्याचा छंद जडला आहे. अगदी दीडशे ते दोनशे वर्ष पूर्वीचे रेडिओ त्यांच्या संग्रहात पाहायला मिळतात. विशेष म्हणजे बहुतांश रेडिओ हे आजही व्यवस्थित सुरू आहेत. त्यात कोणत्या अडचणी आल्या; तर सतीश पाटील हे स्वतः दुरुस्त करून रेडिओ सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या चाळीस वर्षांपासून सतीश पाटील यांचे रेडिओ संग्रहाच काम सुरू आहे. जुन्या रेडिओची माहिती मिळताच विविध जिल्ह्यातून त्यांनी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळीकडून हे रेडिओ संग्रहित केले आहेत. तर काही रेडिओ त्यांनी भंगार बाजारातून तर काही जुन्या वस्तूंचा संग्रह करणाऱ्या व्यक्तींकडून पाहिजे तशी किंमत देऊन हे रेडिओ संच मिळविले आहे.

अभ्‍यासासाठीही महत्‍त्‍वपुर्ण

रेडिओ उत्क्रांतीमधील विविध टप्प्यात होत गेलेल्या सुधारणांमधील तब्बल दीडशे रेडिओचा अनोखा संग्रह जळगाव शहरातील सेवानिवृत्त्त शिक्षक सतीश पाटील यांनी केला आहे. त्यांचा हा अनोखा रेडिओ संग्रह नव्या पिढीतील तरुणांसाठी केवळ आदर्श आहे असे नव्हे; तर अभ्यासासाठी ही महत्व पूर्ण राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com