लडकी समजके फ्लॉवर समजे क्‍या, फायर है हम..सोशल मीडियावर पोस्‍टर वॉर

लडकी समजके फ्लॉवर समजे क्‍या, फायर है हम..सोशल मीडियावर पोस्‍टर वॉर
Aditi tatkare
Aditi tatkaresaam tv
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना बदलण्यासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आक्रमक झाले असताना गोगावले यांनाच बदलण्याची वेळ आली असल्याचा पलटवार राष्ट्रवादीतर्फे सुरू झाला आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्टर वॉर सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत कुरखोडी समोर आल्याने जिल्ह्यात (Raigad News) आघाडीत बिघाडी सुरू झाली आहे. (raigad news Poster war of NCP Shiv Sena on social media)

Aditi tatkare
भडगाव पंचायत समितीच्या निवासस्थानातून फाईलींची चोरी

आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी माणगाव येथे १० फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री बदलण्याची भूमिका घेतली. याला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचाही पाठिंबा आहे. यानंतर जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सोशल मीडियावर पोस्टर वॉर सुरू झाले आहे.

राष्‍ट्रवादी– शिवसेनेचे पोस्टर वॉर

शिवसेनेच्या पालकमंत्री (Aditi Tatkare) बदलावा या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसने जसाच तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पालकमंत्री बदलण्याऐवजी महाडचे आमदार बदलण्याची वेळ आली असल्याचे पोस्टर फेसबुक या सोशल मीडियावर झळकले आहे.

फ्लॉवर समजे क्‍या..फायर है हम

लडकी समजके फ्लॉवर समजा, फायर है मै, क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढला की बदनामी अटळ असते, जिकण्याची क्षमता एवढी असावी की हरविण्यासाठी प्रयत्न नाही कट रचले पाहिजे; असे पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आले आहेत. पालकमंत्री नाही महाड विधानसभेचा आमदार बदलण्याची वेळ आली आहे. २०२४ ला महाडचा आमदार बदलू हा आमचा शब्द आहे. असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षातील संघर्ष जिल्ह्यात चांगलाच रंगला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com