निंबादेवी धरण, मनुदेवीसह चार ठिकाणांवर जाण्यास बंदी

निंबादेवी धरण, मनुदेवीसह चार ठिकाणांवर जाण्यास बंदी
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : सध्‍या सुरू असलेल्‍या पावसामुळे पर्वतरांगामधील धबधबे वाहत आहेत. यामुळे येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. असेच यावल तालुक्यातील (Jalgaon News) पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या निंबादेवी धरणावर देखील पर्यटकांची मोठी गर्दी झालेली पहावयास मिळाली होती. परंतु, येथे नियमांचे पालन होत नसल्‍याने निंबादेवी धरणासह चार ठिकाणी तहसीलदारांनी पर्यटनास (Tourism) मज्जाव करण्याचे निर्देश जारी केले आहेत. (Jalgaon News Manudevi Nimbadevi Dam)

Jalgaon News
बॅंकेचे कर्ज फेडू न शकल्याने अल्पभुधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या...

यावल (Yawal) तालुक्याला लागूनच सातपुड्याची पर्वतरांगा असून यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. यात अलीकडच्या काळात निंबादेवी धरण हे पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. दरम्‍यान रविवारी येथे पर्यटकांची अधिकच गर्दी झाली होती. यामुळे येथे अनेकांच्या जीवाला धोका असतांनाही लोक बेदरकारपणे वागत असल्याचे दिसून आले आहे. लोणावळा (Lonavala) येथील भुशी डॅमप्रमाणे येथे पायऱ्या असल्याने अगदी महिला आणि मुलेसुध्दा येथे भिजण्याचा आनंद घेतात.

या चार स्‍पॉटवर बंदी

येथे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने यावलच्या तहसीलदारांनी आज निर्देश जारी करत निंबादेवी धरणावर पर्यटनास जाण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे. या निर्देशांमध्ये निंबोदेवीच्या धरणासह मनुदेवीचा धबधबा, वड़ी धरण आणि हरीपुरा धरण या चार ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. हे निर्देश पुढील सूचना येईपर्यंत जारी करण्यात आल्याचे यावल तहसीलदारांनी नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com