जळगाव : रात्रीचे जेवण आई-वडील आणि बहिणींसोबत केले. यानंतर गप्पा केल्या व घराच्या वरच्या खोलीत झोपायला गेला. परंतु खोलीत गेल्यानंतर गळफास घेत (Jalgaon) त्याने जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. (Live Marathi News)
कुसुंबा (ता. जळगाव) येथील तेजस धोंडू पाटील असे या तरूणाचे नाव असून, तेजस रात्री रूममध्ये झोपायला गेला परंतु दिवस उजाडूनही मुलगा खाली येत कसा नाही, म्हणुन वडील उठवायला गेले असता त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्याच्या वडिलांनी एकच आक्रोश केला. त्यावेळी कुटूंबासह शेजाऱ्यांनी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलीसांना कळविण्यात आले. (Jalgaon Medical Collage) वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
वडिलांना कामात करायचा मदत
तेजसच्या वडिलांचे गॅरेज आहे. दरम्यान तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या कामात मदत करुन कुटूंबाला हातभार लावत होता. घरातील करता मुलगा गेल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.