महसूल कर्मचारी संप; तीन कर्मचाऱ्यांना आली भोवळ

महसूल कर्मचारी संप; तीन कर्मचाऱ्यांना आली भोवळ
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना बराच कालावधी होऊनही त्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांकडून सोमवारपासून (ता. ४) निदर्शने व घोषणाबाजी करीत बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनात तीन महसूल (Jalgaon News) कर्मचाऱ्यांना उन्हाच्या तीव्रतेने भोवळ आल्याची घटना घडली. उपस्थित कर्मचाऱ्यांना भोवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना सावलीत नेले. नंतर घरी पाठविले. (jalgaon news Revenue employee strike Three employees got dizzy)

Jalgaon News
इंधन दरवाढ; बळीराजाला मशागतीसाठीच्‍या खर्चातही वाढ

दरम्यान आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्यातील महसुल कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत मंत्रालयात आढावा घेतला. उद्या (ता.७) सर्व विभागीय आयुक्तांना आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा करून अहवाल मागविला आहे. महसूल कर्मचाऱ्यांचा मागण्या शासन मंजूर करणार आहे. मग विभागीय आयुक्तांशी चर्चा कशाला करायची असा पावित्रा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. आयुक्तांकडे चर्चेला जायचे नाही. गेले तरी तुम्ही मागण्या मान्य करीत असाल तरच बोलण करा; असे सांगत चर्चा करायची नाही. असे ठरविण्यात आले आहे.

महसुल कर्मचारी आंदोलनात महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, शिपाई संवर्गातील कर्मचारी सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. सर्वच शासकीय कामे ठप्प झाल्याने नागरिकांच्या फेऱ्या वाया जात आहेत. जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा महसूल वाहनचालक संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com