इंधन दरवाढ; बळीराजाला मशागतीसाठीच्‍या खर्चातही वाढ

इंधन दरवाढ; बळीराजाला मशागतीसाठीच्‍या खर्चात भर
Farmer
FarmerSaam tv
Published On

जळगाव : एकविसाव्या शतकात शेती मशागतीसाठी पारंपरिक पद्धत जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाकडे शेतकरी वर्ग वळला आहे. यामधून मजुरी व वेळेची बचत होऊ लागली आहे. असे असले तरी पेट्रोल (Petrol) व डिझेलच्या भाववाढीमुळे शेतीचे आर्थिक गणित बिघडले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला इंधन भाववाढीची गुढी गगनाला भिडल्याने शेती व्यवसाय कसा करायचा ? अशी चिंता जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. मशागतीच्या दरात २०० ते ५०० रूपयांची वाढ झाली आहे. (jalgaon news Fuel price hike Increase the cost of cultivation for farmer)

Farmer
उन्हाची तीव्रता वाढली; तापमानात दोन अंशाने वाढ

खरिपात अतिवृष्टीने कापसासह सर्वच पिके धोक्यात आली. अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला कापूस हिरावला गेला. रब्बी हंगामात येणारी पिके आर्थिक पाठबळ देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र त्यातही अवकाळी पावसाने गहु, मका, ज्वारी, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले.

मशागतीपासून वाहतुकीवर परिणाम

रब्बी हंगामातील गव्हासारख्या पिकातून आर्थिक प्राप्ती होईल, असे असताना शेतातील यांत्रिकीकरणामुळे अजून बिकट प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेती यांत्रिकीकरणामुळे मजूर व वेळेची बचत होईल, असे असतानाही वाढलेले डिझेल व पेट्रोलचे दर शेतकऱ्यांना (Farmer) परवडत नाही. त्यामुळे ट्रॅक्‍टर व हार्वेस्टिंगच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. माल वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.

महागाईची फटका मजूरीवर

यांत्रिकीकरणाची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पीक काढणीसाठी मजुरांची मदत घ्यावी लागत आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस इतर वस्तूंची महागाई वाढल्याने मजुरी दरातही भरमसाट वाढ झाली आहे. आजच्या स्थितीत पेट्रोल १२० रुपये तर डिझेल १०५ रुपये प्रतिलीटर मिळत आहे. यंदा गव्हाला एकरी ७ ते ८ क्विंटल उतारा मिळाला. दादरचा उतारा ३ ते ४ क्विंटल आला. गव्हाचे दर वाढले असले तरी देखील इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com