Jalgaon ZP Recruitment 2023: जळगाव जिल्हा परिषदेत ६२६ जागांसाठी भरती प्रक्रिया; उद्यापासून होणार प्रक्रियेला सुरवात

जळगाव जिल्हा परिषदेत भरती 2023: जळगाव जिल्हा परिषदेत ६२६ जागांसाठी भरती प्रक्रिया; उद्यापासून होणार प्रक्रियेला सुरवात
Jalgaon ZP
Jalgaon ZPSaam tv
Published On

Jalgaon ZP Recruitment:

जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत एकूण १७ संवर्गांसाठी ५ ऑगस्टपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सदरची भरती प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीमार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रिया दरम्यान (Jalgaon ZP) जळगाव जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची ६२६ पदे भरली जाणार आहेत. एका पदासाठी संपूर्ण राज्यात एकाचवेळी परीक्षा होणार असल्याने (Jalgaon) उमेदवारांनी शक्यतो एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करावे असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (Live Marathi News)

Jalgaon ZP
Statistics Of Pune Accident: पुणेकरांनो सावधान! रस्ते अपघातात जातोय रोज एकाचा बळी; वर्षभरातील आकडेवारी चिंता वाढवणारी, कारण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली बहुचर्चित जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात ५ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. संपूर्णपणे ऑनलाईन होणाऱ्या या भरती प्रक्रियेत जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागातील १७ संवर्गातील एकूण ६२६ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी जाहिरात देण्यात येणार असून राज्य पातळीवरील आयबीपीएस कंपनीच्या मार्फत ऑनलाइन परीक्षाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

Jalgaon ZP
Snake Bite : रात्री झोपेतच सर्पदंश; सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे संपूर्णपणे पारदर्शकता या प्रक्रियेत असणार आहे. उमेदवारांनी ठरवून दिलेल्या विहित मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्हा परिषदेची संपूर्ण तयारी झालेली असून भरती प्रक्रिया योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल; अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी दिली आहे. 

भरती प्रक्रिया पारदर्शकपणेच राबविली जाणार

जिल्हा परिषदेच्या ६२६ पदांसाठी सुरू होणारी भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयबीपीएस कंपनी मार्फत घेण्यात येणार असल्यामुळे या भरती प्रक्रियेत संपूर्णपणे पारदर्शकता असेल. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या भरती प्रक्रियेत उमेदवारांनी मुदतीत अर्ज करावेत.
 - श्री. अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जळगाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com