जुगार अड्ड्यावर धाड; 4 शिक्षकांसह 12 ताब्यात

जुगार अड्ड्यावर धाड; 4 शिक्षकांसह 12 ताब्यात
Muktainagar
MuktainagarSaam tv

मुक्ताईनगर (जळगाव) : शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या पत्ता जुगाराचे क्लबवर मुक्ताईनगर पोलीसांनी मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता धाड टाकली. यात बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात चार शिक्षकांचा देखील समावेश आहे. (jalgaon news Raids on gambling dens 12 in custody with four teachers)

Muktainagar
तीन- चार वर्षात रस्ते अमेरिकेच्‍या दर्जाचे; मंत्री नितीन गडकरी

शहरातील आदर्श शाळेच्या रस्त्याने किशोर बोदडे यांचे घराजवळ (Jalgaon News) सार्वजनिक जागी अवैधरित्या पत्ताचा डाव रंगलेला होता. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस (Police) निरीक्षक शंकर शेळके यांचेसह पथकाने छापा टाकत त्या ठिकाणी पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना आकाश यशवंत सापधरे, व्यंकटेश राजेंद्र बाराहाते, महेंद्र विठोबा कोळी, विठ्ठल नागोराव मेहत्रे, नीलेश कालीदास पाटील , विजय शामराव गोसावी, अशोक हरचंद सोनवणे, संदीप शिंदे, धर्मेद्र सापधरे, अतुल रघुनाथ लोंढे, वामन बोदडे, अतुल जावरे यांना रंगेहात पकडण्यात आले.

सव्‍वा लाखाच्‍यावर मुद्दमाल जप्‍त

पो. कॉ. शब्बीर तडवी यांचे फिर्यादीवरुन पोलीसात बारा जुगारीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोख रक्कम, चार दुचाकी, सात मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकुण १ लाख ३६ हजार ९४० रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस आसीम तडवी करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com