मुलीच्या विवाहात वऱ्हाडींना आहेर नव्‍हे तर दिली श्रीमद भगवद्‌ गीता

मुलीच्या विवाहात वऱ्हाडींना साडी–चोळी नव्‍हे तर श्रीमद भगवद्‌ गीता
marriage
marriage
Published On

शहापूर (जळगाव) : जामनेर आगारातील निवृत्त चालक कोमलसिंग पाटील यांनी त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात कपडे, भांडी व रोख रक्कम असा कोणताही आहेर स्वीकारला नाही. उलट आलेल्‍या वऱ्हाडी मंडळीला श्रीमद भगवत गीता ग्रंथ भेट दिला. (jalgaon-news-marriage-of-a-girl-Bhagavad-Gita-gift)

लग्‍नसोहळा म्‍हटला की मान– पान येतो. यात वधू किंवा वराला लग्‍नात पैसे देण्याची प्रथा आहे. शिवाय वधू व वराच्‍या माता– पित्‍याला कपड्यांचा आहेर दिला जातो. या बदल्‍यात दोन्‍ही पक्षांकडून वऱ्हाडींना आहेर म्‍हणून साडी किंवा भांडे दिले जातात. मात्र या प्रथेला फाटा फोडत कोमलिसिंग पाटील यांनी आहेर घेतला किंवा दिला नाही.

marriage
कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची सात लाखाची फसवणूक

सर्व वऱ्हाडींना गीता भेट

जामनेर तालुका महानुभाव मंचचे तालुकाध्यक्ष व राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या जामनेर आगारातील निवृत्त चालक कोमलसिंग पाटील यांची मुलगी मेघना हिचा विवाह आज (ता. ६) भुसावळ येथे झाला. या विवाह सोहळ्यात श्री. पाटील यांनी कोणताही आहेर स्वीकारला नाही. उलट वऱ्हाडी मंडळीला श्रीमद भगवत गीता ग्रंथ भेट म्हणून दिला व सोबत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या श्रीमद्भगवत गीताज्ञान स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वऱ्हाडींना देऊन त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

प्रचार– प्रसारासाठी उपक्रम

उपक्रमाविषयी श्री पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की गीता मनाचे आजार दूर करण्याचे सशक्त माध्यम असून आपले कर्तव्य, कर्म, निष्ठेने, प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची प्रेरणा गीता देते. अध्यात्म, विज्ञान, योगी, संन्यासी, उद्योग व्यवसाय, राजकारणी, प्रापंचिक अशा सर्वच घटकांसाठी श्रीमद्भगवत गीता मार्गदर्शक ग्रंथ असल्याने त्या ज्ञानाचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी वऱ्हाडीना गीता ग्रंथ भेट देण्याचा निर्णय घेतल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com