नांदेड : शहराच्या तरोडा (बुद्रुक) परिसरातील राहुल कॉलनी, चैतन्य नगर भागात राहणाऱ्या एका महिलेला समाज कल्याण कार्यालयाकडून 28 लाख रुपये कर्ज मिळवून देतो असे म्हणून दोघांनी सात लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ता. १४ एप्रील २०२० ते पाच मे २०२१ या दरम्यान घडला. या प्रकरणी सोमवारी (ता. पाच) रात्री उशिरा भाग्यनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळवून दिलेल्या कर्जामधून प्लॉट व घर घेऊ शकता असे आमिष दाखवून त्यासाठी सात लाख दोन हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, राहुल कॉलनी, चैतन्यनगर येथील मीना सूर्यकांत गायकवाड ही आपल्या घरी होती. यावेळी आयुर्वेद औषध विकण्यासाठी वैशाली हरिचरण चौडेकर ही या भागात आली. आपसुकच या वैशालीकडून मीना गायकवाड यांनी काही औषध विकत घेतले. आणि यातूनच या दोघींची पक्की ओळख झाली. कर्जाचे आमिष दाखवून महादेवअप्पा शंकरअप्पा मटवाले यांच्या फोन पे नंबर ( ९०४९५७५३०१) वर अगोदर पाच हजार रुपये तीन वेळेस व नगदी पाच लाख रुपये वळवून घेतले. एवढेच नाही तर वैशाली हिच्या ३८५८८८८३ या बँक खात्यावर मीना गायकवाड यांच्या मुलाने ९७ हजार रुपये टाकले. पैसे दिल्यानंतरही कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे कर्जाचे काय झाले असे म्हणून मिना गायकवाड ही त्यांच्याकडे पाठपुरावा करत होती.
पैशाची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. तसेच कर्ज मंजूर होण्यासाठी वेळ लागतो असे म्हणून वेळ काढूपणा केली. आपले हक्काचे पैसेही परत दिले नसल्याने त्यांच्याबाबत माहिती विचारली असता ते भामटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मीना गायकवाड यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भाग्यनगर पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात
वैशाली हरिचरण चौडेकर व महादेवअप्पा शंकरअप्पा मटवाले दोघे राहणार गोपाळचावडी, नांदेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री कांबळे करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.