jalgaon corporation
jalgaon corporation

जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटलांवर गोळीबार

जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटलांवर गोळीबार
Published on

जळगाव : जळगाव महापालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. उपमहापौरांवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. परंतु, सदर गोळीबार हा पुर्ववैमनस्‍यातून झाल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे. (jalgaon-news-jalgaon-municipal-corporation-firing-on-deputy-mayor-kulbhushan-patil)

जळगाव महापालिकेत सत्‍ता पालट करत शिवसेनेने सत्‍ता स्‍थापन केली. यात कुलभूषण पाटील यांची उपमहापौर म्‍हणून निवड झाली. यानंतर त्‍यांनी काही महिन्यांपासून महापालिकेच्या राजकीय वर्तुळात प्रचंड वेगाने सक्रिय झाले. कुलभूषणू पाटील हे शिवसेना कार्यकर्ता म्हणून कारकीर्दीस सुरवात केली. कुलभूषण पाटील यांच्यावर झालेला हल्ला नेमका वाळू व्यवसायातून आहे की, राजकीय वादातून हे अद्याप समोर आलेले नाही. उपमहापौरांवर गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच परिसरातून नागरिकांनी कुलभूषण पाटील यांच्या घराकडे धाव घेतली.

jalgaon corporation
आज मुख्यमंत्री साता-यात, उपमुख्यमंत्री काेल्हापूरात

चारचाकीतून आले हल्‍लेखोर

गोळीबारानंर प्राप्त माहितीनुसार हल्लेखोर चारचाकी वाहनातून आले. त्यांनी पिंप्राळा येथील कुलभूषण पाटील यांच्या घरावर गोळीबार केला. यात ते सुदैवाने बचावले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उपमहापौर कुलभूषण पाटील परिसरातील काही नागरिक प्रत्यक्षदर्शी यांच्यासह तक्रार देण्यासाठी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोहोचले होते, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, निरीक्षक अनिल बडगुजर पोलिसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळावर दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com