Eknath Khadse News: 'शरद पवारांचा राजीनाम्यास नकार, मी राष्ट्रवादीमध्येच', एकनाथ खडसेंचे मोठे विधान; भाजप प्रवेशाचं काय?

Eknath Khadse Latest News: एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये शुभेच्छांचे बॅनर झळकावण्यात आले आहेत. या बॅनरवर शरद पवार, मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकले होते.
Eknath Khadse News: 'शरद पवारांचा राजीनाम्यास नकार, मी राष्ट्रवादीमध्येच', एकनाथ खडसेंचे मोठे विधान; भाजप प्रवेशाची शक्यता मावळली?
Eknath Khadse Latest News:Saam tv
Published On

जळगाव, ता. २ सप्टेंबर २०२४

राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याची घोषणा लोकसभेच्या तोंडावर केली होती. मात्र अद्यापही एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाही, दुसरीकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेच फोटो दिसत होते. त्यामुळे नाथाभाऊ नेमके कोणाचे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत आता स्वतः एकनाथ खडसे यांनी मोठा खुलासा केला असून भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे असे महत्वाचे विधान केले आहे.

Eknath Khadse News: 'शरद पवारांचा राजीनाम्यास नकार, मी राष्ट्रवादीमध्येच', एकनाथ खडसेंचे मोठे विधान; भाजप प्रवेशाची शक्यता मावळली?
Maharashtra Politics: महायुतीमधील संघर्ष शिगेला! शिंदेसेनेच्या आमदाराचे राष्ट्रवादीवर दगाबाजीचे आरोप; रायगडमध्ये राजकारण तापलं

काय म्हणाले एकनाथ खडसे?

'भारतीय जनता पक्षामध्ये आपला प्रवेश करण्यात यावा अशी विनंती आपण भाजपकडे केली होती. मात्र भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे, मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार,' असे सर्वात मोठे विधान एकनाथ खडसे यांनी केले आहे.

भाजप प्रवेशाला विरोध...

"भाजपामध्ये जाण्याची माझी इच्छा होती, माझ्या काही अडचणी होत्या, त्या मी जयंत पाटील यांना सांगितल्या होत्या. मात्र भाज कडून प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल.भाजपमध्ये नड्डा जी यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश करण्यात आला, मात्र त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही," त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नसल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Eknath Khadse News: 'शरद पवारांचा राजीनाम्यास नकार, मी राष्ट्रवादीमध्येच', एकनाथ खडसेंचे मोठे विधान; भाजप प्रवेशाची शक्यता मावळली?
Crime News : धक्कादायक! IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; विद्यापीठाच्या वसतिगृहात आढळला मृतदेह

बॅनरवर झळकले फोटो

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये शुभेच्छांचे बॅनर झळकावण्यात आले आहेत. या बॅनरवर शरद पवार, मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो झळकले होते. त्यामुळे नाथाभाऊ नेमके भाजपचे की राष्ट्रवादीचे? असा सवाल उपस्थित होता. अशातच आता एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Eknath Khadse News: 'शरद पवारांचा राजीनाम्यास नकार, मी राष्ट्रवादीमध्येच', एकनाथ खडसेंचे मोठे विधान; भाजप प्रवेशाची शक्यता मावळली?
Best Bus Accident : मद्यधुंद प्रवाशाने स्टेअरिंग खेचलं, बेस्ट बसने 9 जणांना उडवलं; लालगबागमधील थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com