जळगाव : महिनाभर उशिराने पावसाला सुरवात झाली. परंतु, जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात यंदाचा दमदार पाऊस (Rain) झाला. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजाची प्रतिक्षा देखील आता संपली आहे. (Jalgaon news Heavy rains in Jalgaon district)
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात यंदाचा पहिला दमदार पाऊस सोमवारी सायंकाळी झाला. यापुर्वी वादळी वारा व मुसळधार पाऊस झाला होता. मात्र त्या पावसाने जमिनीतील ओलावा वाढलेला नव्हता. मात्र सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने जमिनीची भुक देखील मिटली आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. पाचोरा (Pachora) तालुक्यातील सामनेरसह लासगाव, नांद्रा परिसरात पाऊस झाला. तसेच कढोली (ता. एरंडोल) व भुसावळ (Bhusawal) शहरातही दमदार पाऊस झाला. जिल्ह्यामध्ये साधारण सर्व ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(Monsoon Latest News updates)
सकाळीही पावसाची रिपरिप
रात्री पाऊस झाल्यानंतर आज पुन्हा सकाळपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाला सुरवात झाली. यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते. महापालिकेने खड्डे बुजवले नसल्यामुळे त्यात पाणी साचले होते. यामुळे वाहनधारकांची कसरत होत असल्याचे पाहण्यास मिळाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.