पर्यटकांसाठी पर्वणी..सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहीत

पर्यटकांसाठी पर्वणी..सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहीत
waterfall
waterfall Saam tv
Published On

नांदेड : मराठवाडा- विदर्भाच्या सिमेवर असलेला नांदेड जिल्‍ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा यंदाच्या पावसाळ्यात खळखळून वाहू लागला आहे. पर्यटनाचे मोठे केंद्र असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा (Waterfall) कधी प्रवाहीत होईल याची वाट पाहत होते पर्यटकांची ही प्रतिक्षा संपली आहे. (Nanded news tourists spot Sahastrakund waterfall flowing)

waterfall
Nandurbar: रेल्वे कॉलनीच्‍या गटारात आढळला बालिकेचा मृत्यूदेह

धबधब्‍याच्‍या परिसरात दोन दिवसांपासून पडत असलेल्या (Rain) पावसामुळे धबधबा प्रवाहीत झाला आहे. आता पर्यटक देखील सहस्त्रकुंड धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. गेल्या वर्षी हा धबधबा सहा महिने (Nanded News) प्रवाहीत होता. त्यामुळे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

विकेंडला पसंती

यंदा मात्र पावसाळा उशिरा सुरू झाल्याने धबधबा ही उशिरा प्रवाहीत झाला आहे. आता मात्र, विकेंडला पर्यटकांची पसंती सहस्त्रकुंड धबधबाच राहणार आहे. धबधब्याचे आनंद घेणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाने प्रतिबंधीत भागात न जाण्याचे अवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com