
चोपडा (जळगाव) : बाळासाहेबांनी ज्यांना एवढी उंची दिली; त्या बाळासाहेबांना शेवटच्या घटकांमध्ये या लोकांनी त्रास दिला आहे. त्यामुळे सहाजिकच कार्यकर्त्यांचे भावना आहेत. ज्या माणसाने बाळासाहेबांना त्रास दिला, त्यांनी नौटंकी करून साहेबांच्या समाधीवर जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकर्त्यांनी जे गोमुत्र शिंपडले ते बरोबर आहे. गद्दारांचे हात समाधीला लागता कामा नये. सेनेच्या कार्यकर्त्यांनी जे केले ते योग्य केले असल्याची प्रतिक्रीया स्वच्छता, पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (jalgaon-news-guabrao-patil-raksha-bandhan-chopda-sister-and-press-statment-narayan-rane)
रक्षाबंधननिमित्ताने शहरातील सुंदरगढी भागातील मोठी बहीण निर्जलाबाई नारायण देशमुख यांच्याकडे आज (ता.२२) सकाळी आले होते. यावेळी रक्षाबंधननिमित्ताने बहिणीने लहान बंधू तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे औक्षण करून राखी बांधली. यावेळी सेनेचे नगरसेवक महेश पवार, राजाराम पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख, भरत देशमुख आदी उपस्थित होते.
जनआशीर्वाद यात्रा म्हणजे लोकांना त्रास देण्याचा प्रकार
जनआशीर्वाद यात्रेबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, की जनआशीर्वाद यात्रा म्हणजे लोकांना संकटातून बाहेर येत असताना त्रास देण्याचा प्रकार आहे. जनयात्रा काढली पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण ज्यांच्यामध्ये जनाधिकारच राहिलेला नाही. जनाधिकार तो संपलेला आहे. त्यांनी यात्रा काढून लोक आपल्याकडे कसे वाढतील? हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
कुणी कितीही कोल्हेकुई केली तरी मुंबईवर भगवाच
तीस वर्षाच्या सत्तेत बऱ्याच लोकांनी शिवसेनेला आव्हान केले. मुंबई आणि शिवसेना व शिवसेना आणि मुंबई हे दृढ नाते म्हणजे अतूट नाते आहे. जेव्हा संकट येते तेव्हा मुंबईकरांना शिवसेना आठवते. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले कुणी कितीही कोल्हेकुई केली तरी बाळासाहेबांचा आशीर्वादाने आहे; तोपर्यंत महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा बाळासाहेबांचा आशीर्वादाने फडकतो आहे. तो निश्चितपणे येत्या काळात सुद्धा महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला.
शिंदेबाबत राणेंचा पोकळ अंदाज
एकनाथ शिंदे सेनेत अस्वस्थ आहेत असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात यावर पालकमंत्री म्हणाले की, नारायण राणे किती दिवस अस्वस्थ होते ते आपण पाहिले आहे. त्यांचा अस्वस्थपणा आता मंत्रिपद मिळाल्यामुळे कमी झाला आहे. पूर्वी हे भाजप- शिवसेनेत अस्वस्थ होते. नंतर काँग्रेसमध्ये गेले तेथेही अस्वस्थ झाले. आता त्यांना सूक्ष्म लघु खाते मिळाले आहे. त्यामुळे त्यांची डोकेही सूक्ष्म झाले आहे. एकनाथ शिंदे ही दिघे साहेबांचे चेले आहेत ज्यांनी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम ठेवत ठेवला. चुकीचा हवामानाचा अंदाज कसा केला जातो ज्यावेळी सांगितले जाते की, पाणी पडणार नाही; त्यावेळेस पाणी पडते आणि ज्यावेळेस सांगितले जाते की, पाणी पडणार तेव्हा पाणी पडत नाही, तसा नारायण राणेंचा पोकळ अंदाज आहे.
बहिण व जनतेच्या आशीर्वादाने यश
३५ ते ४० वर्षापासून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नियमित रक्षाबंधनासाठी येत आहे. हा गोड सण म्हणजे भाऊ-बहिणीचे दृढ नात्याचा सण आहे. संकटात आईनंतर बहिणीची आठवण येत असते. यातून ऊर्जा, आशीर्वाद मिळतो. राजकारणात कितीही धकाधकीची स्थिती असली तरी नाते विसरू नये. मला मिळालेले यश, फलश्रुती ही कुटुंब, जनता व बहिणीच्या आशीर्वादाने मिळालेली असल्याचे पालकमंत्री यांनी मोठ्या मनाने व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.