चाळीस वर्षात पहिल्‍यांदाच ऑगस्‍टमध्‍ये धरणात ४० टक्के पाणी

पहिल्‍यांदाच ऑगस्‍टमध्‍ये धरणात ४० टक्के पाणी
Aner Dam
Aner Dam
Published On

जळगाव : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी बांधण्यात आलेल्या अनेर धरण मागील चाळीस वर्षात भरले नाही इतके ते यंदा ऑगस्‍ट महिन्‍यात भरले आहे. मागील चाळीस वर्षात प्रथमच इतका साठा झाल्‍याचे सांगितले जात आहे. (jalgaon-news-first-time-in-August-40-parcantage-water-in-the-aner-dam)

चोपडा तालुक्‍यातील गणपूरपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अनेर धरणाचे (अनेर मध्यम प्रकल्प) सर्व दहा दरवाजे १५ ऑगस्टपर्यंत उघडे असतात. तोपर्यंत आलेले सर्व पाणी पूर म्हणून वाहून जाते. १५ ऑगस्टला दरवाजे बंद केल्यावर नंतरच्या पावसाळ्यात हे धरण भरते. पण यावर्षी सातपुडा पर्वत रांगेत पाऊसच न झाल्याने नदीला पूरच आला नाही. त्यामुळे धरण खाली राहिले आहे.

धरण परिसरात वरील बाजूस सातपुडा पहाड असल्याने पहाडात झालेल्या पावसामुळे हे धरण सहज भरते. असे आज पर्यंतचे अनुभव आहेत. मात्र यावर्षी असलेल्या लहरी पावसाळ्यामुळे ते भरू शकले नाही. धरण परिसरात कालचा १५ मिलिमीटर पाऊस लक्षात घेता एकूण १६० मिलिमीटर पाऊस आतापर्यंत झाला असून २१६.४० मीटर क्षमता असलेल्या धरण पात्रात अवघा २११.१० मीटर पाणीसाठा आहे. धरण पात्रातून सध्या डिस्चार्ज नसून लाईव्ह स्टोरेज २०.५० mcub म्हणजे ४० टक्के पाणीसाठा आहे.

Aner Dam
अन्‌ थेट शेतात जावून बांधली राखी

१९७८ मध्‍ये धरणाचे काम

धरणाचे काम १९७४ ते १९७८ च्या दरम्यान होऊन आजपर्यंतचा इतिहास पाहता या धरणाचे दरवाजे १५ ऑगस्टपर्यंत उघडे राहूनही ते बंद करताच अवघ्या आठवड्यात भरणारे धरण खाली राहिल्याने शासनासह शेतकरी वर्गातही चिंता वाढली आहे. पावसाळा अजून अर्ध्यावर उलटूनही अवघा ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण बांधल्यापासून ऑगस्ट महिना संपत असतांनाही उद्भवणारी ही पहिलीच वेळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com