शनिवारी झाला लसीकरणाचा विक्रम; जळगाव जिल्‍ह्यात घेतली इतक्‍या लस

शनिवारी झाला लसीकरणाचा विक्रम; जळगाव जिल्‍ह्यात घेतली इतक्‍या लस
Corona Vaccination
Corona Vaccination
Published On

जळगाव : जिल्ह्यात लसीकरणाबाबत शनिवार (ता.२१) चांगला ठरला. एकाच दिवशी तब्‍बल ४९ हजार ३० जणांनी घेतली लस घेतल्याचा विक्रम झाला आहे. तालुकास्तरावर १३ हजार १०५ तर ग्रामीण भागात ३५ हजार ९२५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. (jalgaon-news-Vaccination-record-Saturday-So-many-vaccines-taken-in-Jalgaon-district)

दोन महिन्यांपासून जिल्ह्यात अत्यंत मोजक्याच प्रमाणात लसीचा पुरवठा कमी केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे जिल्‍ह्यातील लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली होती. परंतु जिल्ह्यात ४४ हजार ४० कोविशिल्ड तर ५ हजार ६८० कोव्हॅक्सीन लसींची मात्रा उपलब्ध झाल्यानंतर शनिवारी (ता. २१) एका दिवसात तब्बल ४९ हजार ३० जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. आतापर्यत सर्वात जास्त लसीकरण करण्याची विक्रमी संख्या असल्याचे दिसून आले आहे.

असे झाले आहे आतापर्यंत लसीकरण

जिल्ह्यात लसीकरण मोहीमेस १६ जानेवारीपासून सुरवात झाली. सर्वप्रथम आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स व तदनंतर प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह मार्चपासून ४५ वर्षे वयोगट तर मे पासून १८ वर्षे वयोगटावरील सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण मोहिमेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण केले जात आहे. मात्र शनिवारी २१ ऑगस्टला ग्रामीण भागात २४ हजार ७११ नागरिकांना पहिला तर ८ हजार ७३२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. तर शहरी भागात ४ हजार ७३३ नागरिकांना पहिला तर ११ हजार २१४ नागरिकांना दुसरा डोसचे लसीकरण करण्यात आले.

Corona Vaccination
चाळीस वर्षात पहिल्‍यांदाच ऑगस्‍टमध्‍ये धरणात ४० टक्के पाणी

प्रभागनिहाय लसीकरण व्‍हावे उपलब्‍ध

शासनस्तरावरून लसींची मात्रा पुरवठ्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात तसेच अनियमिततेमुळे अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावर पहाटेपासून रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने परत जावे लागत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणासह निवडणुकीच्या मतदान चिठ्ठ्यांचे जसे वाटप केले जाते त्याप्रमाणे ‘बीएलओं’मार्फत वॉर्ड प्रभागनिहाय लसीकरण उपलब्ध झाल्यास नागरिकांना लसीकरण करणे अधिक सोयीचे होईल असे नागरिकांना वाटते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com