
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींसाठी तर यावल तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat) मतदानाची प्रक्रीया पार पडत आहे. दोन्ही तालुक्यांमधील मतदान केंद्रावर मतदारांच्या (Election News) रांगा सकाळपासून पहावयास मिळत आहेत. उद्या मतमोजणी होणार आहे. (Jalgaon News Gram Panchayat Election)
चोपडा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान
चोपडा (Chopda) तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी आज दि.१८ सप्टेंबर रोजी मतदान होत आहे ११ ग्रामपंचायतीमध्ये ३७ प्रभाग असून सदस्य संख्या ९९ तर सरपंच संख्या ११ आहे त्यासाठी सरपंच पदासाठी ७७ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत तर सदस्य सदस्य पदासाठी २०१ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका आदिवासी बहुल भागात आहेत. त्यात बोरअजंटी, कृष्णापुर, मोहरद, पिंपरी, देव्हारी, वैजापूर, कर्जणे, मेलाने, मोरचिडा, उमरटी, सत्रासेन अश्या अकरा ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून संथगतीने मतदानाला सुरुवात झाली आहे.
यावल तालुक्यात मतदानासाठी रांगा
यावल (Yawal) तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मालोद व परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीत एकूण २४ सदस्य पदांच्या जागांसाठी व दोन सरपंचपदाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. मालोद ग्रामपंचायतीच्या पाच प्रभागांतील १५ सदस्य पदांसाठी, तर सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. तसेच परसाडे बुद्रुक येथे तीन प्रभागात नऊ सदस्य, व सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. मालोद ग्रामपंचायतीत १५ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचपदाच्या एका जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. परसाडे बुद्रुक येथे नऊ जागांसाठी १९ उमेदवार आहेत. तर सरपंचपदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवारात सरळ लढत होत आहे. दोन्ही ग्रामपंचायतीत आज सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत बहुतेक ठिकाणी रांगा दिसून आल्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.